मुंबई: मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-६ ने कुर्ला परिसरात दोन गोदामांवर छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेल्या २५ लाखांहून अधिक किमतीचा ईलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवर्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी उबेद मोहमद सलीम शेख (वय ३१) नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गुन्हे
शाखा, कक्ष-६
चे प्रभारी पोलीस
निरीक्षक भरत घोणे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती
मिळाली की, आशाबाई
चाळ, सिद्धपूरा मस्जिद
जवळ, माकडवाला कंम्पाउंड, कुर्ला
(प.), मुंबई येथे
एका व्यक्तीने प्रतिबंधित ईलेक्ट्रॉनिक सिगारेट विक्रीच्या उद्देशाने साठा
केला आहे. या माहितीच्या आधारे
पोलीस पथकाने छापा
टाकून ही कारवाई
केली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण
१८८४ नग ईलेक्ट्रॉनिक सिगारेट, विविध
कंपन्यांचे तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवर्स आणि
रोख रक्कम जप्त
केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण
किंमत २५,५०,१९५ रुपये आहे.
आरोपीविरुद्ध इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
सह सिगारेट व
इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि
व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण
विनियमन) अधिनियम सन २००३ च्या
संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला
आहे. या गुन्ह्याचा पुढील
तपास गुन्हे शाखा
कक्ष-६ करत
आहे.
Mumbai Police, Crime News, Electronic Cigarette, Kurla, VBN Police
#MumbaiPolice #CrimeNews #E_Cigarettes #Kurla
#VinobaBhaveNagarPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: