पोलिसांची बनावट पनीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई; ५५० किलो 'चीझ अनालॉग' जप्त

मुंबई, दि. २६ ऑगस्ट, २०२५: मुंबई पोलिसांनी शहरात भेसळयुक्त पनीरची विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या सी.बी. कंट्रोल पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अॅन्टॉप हिल परिसरातील दोन दुकानांवर छापा टाकला आणि ५५० किलो 'चीझ अॅनालॉग' जप्त केले.

'चीझ अॅनालॉग' हा आरोग्यास अपायकारक पदार्थ 'मलाईयुक्त पनीर' या नावाने कमी दरात विकला जात होता. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या नियमांनुसार, जर एखाद्या उत्पादनात खरे चीज नसले आणि ते चीजसारखे दिसत असेल, तर त्यावर 'चीझ अॅनालॉग' असे स्पष्टपणे लेबल लावणे अनिवार्य आहे.

ही कारवाई 'ओम कोल्ड्रींक हाऊस' आणि 'श्री गणेश डेअरी' या दुकानांवर करण्यात आली. पोलिसांनी दुकानांमध्ये आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोमधून हे भेसळयुक्त पनीर जप्त केले.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ केवळ विश्वसनीय दुकाने किंवा ब्रँडकडूनच खरेदी करावेत आणि पॅकेजवरील लेबल काळजीपूर्वक तपासावे. बनावट पनीर रबरासारखे किंवा मेणासारखे जाणवते, तर खरे पनीर दाणेदार आणि दुधाच्या नैसर्गिक वासाचे असते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


  • Mumbai Police

  • Food Adulteration

  • Cheese Analog

  • Raid

  • Antop Hill

 #MumbaiPolice #FoodSafety #AdulteratedPaneer #AntopHill #CrimeNews

पोलिसांची बनावट पनीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई; ५५० किलो 'चीझ अनालॉग' जप्त पोलिसांची बनावट पनीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई; ५५० किलो 'चीझ अनालॉग' जप्त Reviewed by ANN news network on ८/२७/२०२५ ०६:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".