यापूर्वी अकोला, वाशिम, सातारा आणि लातूर येथे बजावली जबाबदारी
पुणे, दि. २८: पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.
यापूर्वी श्री. पाटील यांनी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय, पुणे तसेच अकोला, वाशिम, सातारा, लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर श्री. पाटील म्हणाले की, "जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन." या वेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Pune
District Information Officer
Yuvaraj Patil
Government
Administration
#Pune #YuvarajPatil #Administration #GovernmentNews #PuneNews
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२५ ०५:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: