जे.जे. हॉस्पिटलमधून पळालेल्या बांगलादेशी महिलेला अटक; पोलिसांची ३ दिवसांची शोध मोहीम यशस्वी
वेशांतर करून आरोपीचा घेतला शोध
आरोपी महिलेला घनसोली येथून अटक
मुंबई : मुंबई पोलिसांनी जे. जे. हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या एका बांगलादेशी महिला आरोपीला अटक केली आहे. सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. वाशी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी रूबीना इरशाद शेख (वय २१) हिला १४ ऑगस्ट २०२५ रोजी उपचारासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. तिथेच तिने महिला पोलीस अंमलदारांच्या हाताला झटका देऊन कायदेशीर कोठडीतून पलायन केले होते.
या घटनेनंतर सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर आणि त्यांच्या पथकाने वेशांतर करून सलग तीन दिवस आरोपीच्या राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणी पाळत ठेवली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी नवी मुंबईतील घनसोली येथे सापळा रचून रुबीना शेख हिला शिताफीने अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्य नारायण चौधरी आणि अपर आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Mumbai Police
Arrest
Crime
Fugitive
Bangladeshi National
#MumbaiPolice #Arrest #Fugitive #Crime #JJCargo #NaviMumbai

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: