पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेत वाहतूक कोंडी, कचरा आणि तुटलेल्या खुर्च्यांसारख्या समस्यांवर नागरिकांनी वेधले लक्ष
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या जनसंवाद सभेत सोमवारी (११ ऑगस्ट २०२५) नागरिकांकडून एकूण ६२ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी अशा सभेचे आयोजन केले जाते.
पिंपरी-चिंचवड शहरातील अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. या सभांचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी भूषवले. आजच्या सभेमध्ये आठही क्षेत्रीय कार्यालयांतून अनुक्रमे ६, ७, ८, ७, ३, १०, १ आणि २० अशा एकूण ६२ तक्रार वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
नागरिकांनी या सभेत विविध समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले. यामध्ये प्रत्येक भागात सुरू असलेल्या स्थापत्य विषयक कामांमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास, मेट्रोच्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी, शहरात ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि खड्डे यांसारख्या समस्यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिक मंचातील तुटलेल्या खुर्च्या, उद्यानांमधील मोडकळीस आलेली खेळणी, बाजाराच्या ठिकाणी वाढलेली वाहनांची गर्दी आणि महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता यांसारख्या सूचनाही नागरिकांनी मांडल्या.
Civic Issues, Pimpri-Chinchwad, Public Grievances, Municipal Corporation, Citizen's Meeting
#PCMC #JansamvadSabha #PimpriChinchwad #CivicIssues #PublicGrievances #CitizenEngagement

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: