पुणे, दि. २८: लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि 'केसरी'चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्वर्गीय दीपक टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, स्वर्गीय दीपक टिळक यांचे पुत्र रोहित टिळक, स्नुषा प्रणति टिळक, मुलगी गीताली टिळक, नातू रौनक टिळक आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे दुःखद निधन झाले असून, आपल्या सर्वांसाठी ही अतिशय दुःखद घटना आहे. डॉ. टिळक यांनी संपादक म्हणून काम पाहिले असून, त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य, मराठी संस्कृतीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी 'केसरी' वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याचा वारसा टिळक परिवार पुढे नेत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे," असेही श्री. शिंदे म्हणाले.
Eknath Shinde, Deepak Tilak Demise, Kesari Wada, Tilak Family Condolence, Lokmanya Tilak, Journalism, Marathi Culture, Pune
#EknathShinde #DeepakTilak #Kesari #LokmanyaTilak #Pune #Condolence #Journalism #MarathiCulture

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: