'Vi' ॲपवर आधीपासूनच विविध सेवा-सुविधांची पेमेंट्स, चित्रपट आणि टीव्ही शो, गेमिंग, ई-कॉमर्सवर खरेदीमध्ये सूट, क्विक कॉमर्स आणि इतर अनेक वेगवेगळ्या सेवा उपलब्ध आहेत. 'Vi फायनान्स' हे 'Vi' ॲपला जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या अनेक सेवा-सुविधा मिळण्याचे 'वन-स्टॉप सोल्युशन' बनवण्याच्या विचारावर आधारित आहे.
भागीदारी आणि उद्दिष्ट्ये
'Vi' फायनान्सने ग्राहकांच्या आर्थिक गरजा विनासायास पूर्ण करण्यासाठी आदित्य बिर्ला कॅपिटल, अपस्विंग फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आणि क्रेडिलिओ यांसारख्या विश्वसनीय आर्थिक संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. व्यक्तिगत कर्ज, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि क्रेडिट कार्ड्स यांसारख्या वेगवेगळ्या, सुविधाजनक आणि सर्वसमावेशक व्यक्तिगत आर्थिक सुविधा प्रदान करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
'Vi' चे सीएमओ श्री अवनीश खोसला यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले, "डिजिटल सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांच्या जीवनात सोपेपणा आणण्यासाठी आम्ही 'Vi' मध्ये कटिबद्ध आहोत. 'Vi' ॲपमध्ये 'Vi फायनान्स'मार्फत आर्थिक सेवा-सुविधा सहजपणे, जलद गतीने आणि उपलब्ध होण्याजोग्या बनवून, आम्ही ग्राहकांना नेहमीच्या गुंतागुंतीशिवाय त्यांचे फायनान्सेस नियंत्रणात ठेवता यावेत यासाठी सक्षम बनवत आहोत. विश्वसनीय आर्थिक संस्थांसोबत आमची भागीदारी असल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार सुयोग्य उत्पादन मिळू शकेल हे निश्चित आहे. हा डिजिटलला प्राधान्य देणारा, कागदविरहित दृष्टिकोन लाखो भारतीयांची फायनान्सेसचे व्यवस्थापन करण्याची पद्धत बदलेल."
'Vi फायनान्स' मधील प्रमुख सुविधा:
'Vi' फायनान्समध्ये खालीलप्रमाणे व्यक्तिगत फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत:
व्यक्तिगत कर्ज (Personal Loans): सोपे, जलद आणि तारणमुक्त
आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहयोगाने ग्राहकांना सहज आणि सुरक्षित पद्धतीने कर्ज उपलब्ध.
₹५०,००० पासून पुढील किमतींच्या कर्जांसाठी अर्ज करता येईल.
आकर्षक व्याजदर: वार्षिक १०.९९% पासून पुढे.
संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि कागदविरहित, कमीत कमी कागदपत्रे आणि सहजसोपे KYC यामुळे अचानक उद्भवणाऱ्या गरजांसाठी उपयुक्त.
फिक्स्ड डिपॉझिट्स (Fixed Deposits): शून्य कागदपत्रे आणि ताबडतोब बुकिंग
अपस्विंग फायनान्शियल टेक्नॉलॉजीज या फिनटेक स्टार्टअपसोबत भागीदारी.
विविध आघाडीच्या बँका आणि आर्थिक संस्थांचे उच्च व्याजदर देणारे फिक्स्ड डिपॉझिट पर्याय उपलब्ध.
ग्राहक कमीत कमी ₹१,००० पासून गुंतवणूक सुरू करून ८.४% टक्क्यांपर्यंत खात्रीशीर व्याज मिळवू शकतात.
प्रति बँक ₹५ लाख रुपयांपर्यंतचे FD डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC, आरबीआयची उपसंस्था) अंतर्गत कव्हर्ड आहेत.
क्रेडिट कार्ड्स (Credit Cards): निवडीला पुरेपूर वाव
क्रेडिलिओच्या सहयोगाने, ग्राहकांना विविध आघाडीच्या बँका (उदा. एसबीआय, ॲक्सिस बँक, एचडीएफसी) आणि आर्थिक संस्थांच्या क्रेडिट कार्ड्ससाठी अर्ज करता येतो.
'FD-बॅक्ड क्रेडिट कार्ड्स' देखील उपलब्ध, ज्यामुळे कमी क्रेडिट हिस्ट्री असलेल्या किंवा पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असलेल्या ग्राहकांना त्यांचा क्रेडिट प्रोफाइल उभारता येईल.
कॅशबॅक, डिस्काउंट, रिवॉर्ड पॉईंट्स आणि ईएमआय पर्यायांचा लाभ घेता येईल. संपूर्ण प्रक्रिया कागदपत्रे जमा न करता किंवा पारंपरिक अडचणीशिवाय पार पडेल.
'Vi' फायनान्स हे आता 'Vi' ॲपवर सुरु झाले असून, देशभरातील ग्राहकांना सुरक्षित, सोपा आणि एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळण्याचा अनुभव घेता येईल. 'Vi' ॲप गूगल प्ले स्टोर किंवा ॲपल ॲप स्टोरवरून डाउनलोड करता येईल.
Vi Finance, Vodafone Idea, Digital Finance, Personal Loans, Fixed Deposits, Credit Cards, Aditya Birla Capital, Upswing Financial Technologies, Credilio, Financial Services, Mobile App, India
#ViFinance #VodafoneIdea #DigitalFinance #PersonalLoan #FixedDeposit #CreditCards #FinancialServices #ViApp #FintechIndia #DigitalIndia
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा