पुणे (प्रतिनिधी) - राजस्थानमधून अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून पुण्यात फरार झालेल्या दोन आरोपींना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक-२ च्या मदतीने करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ जुलै २०२५ रोजी राजस्थानमधील लोहारिया पोलीस स्टेशन, जिल्हा बांसवाडा हद्दीतून एका अल्पवयीन बालिकेला (टोपण नाव: निर्भया) फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी लाला रामु बमनिया (वय २२, रा. बांसवाडा, राजस्थान) आणि सुरेश (रा. सदर) यांच्याविरुद्ध लोहारिया पोलीस स्टेशन, राजस्थान येथे गु.र.नं. ८७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६५(१), पोक्सो ॲक्ट कलम ३, ४ आणि जे. जे. ॲक्ट कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक १५ जुलै २०२५ रोजी राजस्थान पोलिसांकडून पुणे पोलिसांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडे चंदननगर, पुणे येथे आले आहेत आणि सदर आरोपी चंदननगर बाजार परिसरात चहाच्या दुकानात काम करत आहे. या माहितीच्या आधारे, चंदननगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे आणि त्यांच्या स्टाफने, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या स्टाफने चंदननगर बाजार परिसरात आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढला, परंतु वरील नमूद स्टाफच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी लाला रामु बमनिया (वय २२, रा. बांसवाडा, राजस्थान) आणि सुरेश लक्ष्मण खराडी (वय १९, रा. सदर) यांना तुकारामनगर, खराडी येथून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना लोहारिया पोलीस स्टेशन, राजस्थान यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी उपआयुक्त सोमय मुंडे, उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गुन्हे-२, राजेंद्र मुळीक, सहाय्यक आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे येथील वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे, अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा येथील निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या अंमलदारांनी केली आहे.
Child Abuse, POSCO Act, Arrest, Pune Police, Rajasthan Police, Chandan Nagar.
#PunePolice #ChildAbuse #POSCOAct #ArdanNagar #RajasthanPolice #CrimeNews #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: