५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव!

 


सॅन होजे, (प्रतिनिधी): राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून गेल्यावर्षी अमेरिकेत स्थापन झालेल्या 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (NAFA) या संस्थेचा भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव २५ ते २७ जुलैदरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथील 'द कॅलिफोर्निया थिएटर' या आलीशान ठिकाणी रंगणार आहे. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा हा भव्य सोहळा प्रथमच आयोजित करून NAFA ने सर्वांचे लक्ष वेधले होते.

महोत्सवाचे स्वरूप आणि प्रमुख आकर्षण

मराठी चित्रपटांचा परदेशात साजरा होणारा हा एकमेव सोहळा असून, यंदा रसिकांच्या मागणीमुळे हा महोत्सव दोन ऐवजी तीन दिवसांचा होत आहे.

  • २५ जुलै (पहिला दिवस): ‘फिल्म अवॉर्ड्स नाईट’

    • रेड कार्पेट रजिस्ट्रेशन आणि रेड कार्पेट एन्ट्री.

    • ग्लॅमरस पुरस्कार सोहळ्याला सुरुवात.

    • लोकप्रिय मराठी कलावंतांसोबत भेटण्याची, बोलण्याची आणि छायाचित्रे काढण्याची संधी.

    • अमेरिकेतील स्थानिक कलावंत आणि तंत्रज्ञ यांचाही सन्मान.

    • महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती.

  • २६ जुलै (दुसरा दिवस): मुख्य फेस्टिव्हलची सुरुवात

    • मेन थिएटरमध्ये उपस्थितांच्या नोंदणी कार्यक्रमानंतर अभिनेते सचिन खेडेकर यांचे 'कि नोट्स' सह रसिकांशी संवाद.

    • ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर्स’ अंतर्गत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई', 'स्नोफ्लॉवर' चे शो.

    • अभिनेते स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा 'स्नोफ्लॉवर' फायर साइड कार्यक्रम.

    • 'नाफा'ची निर्मिती असलेल्या 'सबमिशन', 'योगायोग' आणि 'द गर्ल विथ रेड हॅट' या लघुपटांचे प्रीमियर शो.

    • अमेरिकेतील स्थानिक कलावंतांसोबत 'पॅनल डिस्कशन' (श्रीयुत मिरजकर, हर्ष महाडेश्वर, संदीप करंजकर यांच्याशी मॉडेरेटर डॉ. गौरी घोलप यांचा संवाद).

    • ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या 'ऐवज' या चरित्रग्रंथाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नव्या आवृत्त्यांचे प्रकाशन.

    • अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची 'फायर साईड' जाणून घेण्याची संधी.

    • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात लेखक-दिग्दर्शक विक्रम वाटवे करणार.

  • २७ जुलै (तिसरा दिवस): समारोपाकडे

    • 'फेस्टिव्हल ओपनिंग पार्टनर्स'ना पुरस्कार.

    • ‘नाफा’ विनिंग 'शॉर्टफिल्म्स'चे स्क्रिनिंग: ‘डंपयार्ड’, 'राडा', 'बिर्याणी'.

    • 'छबिला', 'रावसाहेब' आणि 'प्रेमाची गोष्ट २' या मराठी चित्रपटांचे 'नाफा वर्ल्ड प्रीमियर'.

    • 'स्टुडंट स्पॉटलाईट' विभागातील शॉर्टफिल्म 'चेंजिंग रूम', 'रेबेल', 'काजू कतली' आणि 'द अनाटॉमी ऑफ द डे' यांचे विशेष स्क्रिनिंग.

    • सन्माननीय ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, मधुर भांडारकर, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारेवैदेही परशुरामी यांच्यासोबत पॅनल डिस्कशन.


मास्टर क्लास आणि ‘मीट अँड ग्रीट’

दोन्ही दिवशी (२६ आणि २७ जुलै) इतर सभागृहांमध्येही अत्यंत विलोभनीय कार्यक्रमांचे आयोजन 'नाफा'ने केले आहे.

  • मास्टर क्लास (२६ जुलै):

    • गायक-संगीतकार अवधूत गुप्ते (लय, कथा आणि निर्भीड सत्य).

    • डॉ. पराग हवालदार (चित्रपटांमध्ये कथनात्मक प्रभाव वाढविण्यासाठी कलात्मकता, इमोशन्स सोबत तंत्रज्ञानाचा वापर).

    • प्रख्यात अभिनेत्री अश्विनी भावे (क्रॉसिंग बॉर्डर्स: सिनेमा आणि स्थलांतर यांच्यातील जीवन).

    • महेश कोठारे (मराठी चित्रपटातली विनोदी आणि अद्भुत दुनिया).

    • मधुर भांडारकर (गोष्ट आणि दिग्दर्शनातून वास्तववादी चित्रपटाची पायाबांधणी करताना).

  • मास्टर क्लास (२७ जुलै):

    • सोनाली कुलकर्णी ('सो कुल लाईफ' : अर्थात अ जर्नी विथ सोनाली कुलकर्णी).

    • स्वप्नील जोशी (अभिनयातील स्थित्यंतरे).

    • सचिन खेडेकर (व्हाइस, प्रेझेन्स आणि ट्रुथ).

    • डॉ. मोहन आगाशे (कॅमेऱ्यामधून आयुष्याकडे बघताना).

  • ‘मीट अँड ग्रीट’ (२६ आणि २७ जुलै):

    • २६ जुलैला वैदेही परशुरामी ('लाईट्स कॅमेरा कथ्थक'), अश्विनी भावे ('फिल्म, फेम आणि फार्म फ्रेश'), सोनाली कुलकर्णी ('स्टोरीज दोज् मॅटर'), स्वप्नील जोशी ('रोमान्स, रोल्स अँड द रिअल स्वप्नील'), सचिन खेडेकर ('बियॉंड द स्पॉटलाईट').

    • २७ जुलैला अवधूत गुप्ते ('ट्रॅडीशन मिट्स ट्रेंड्स'), मधुर भांडारकर ('अनफिल्टर्ड मधुर'), महेश कोठारे ('कोठारे अँड सन्स : अ फिल्मी फॅमिली अफेअर'), आदिनाथ कोठारे ('बॉर्न टू बी ऑन सेट').


‘क्रिएटर्स मीट-अप’ आणि डबिंग वर्कशॉप्स

यावर्षी खास युवा पिढीला आकर्षित करणारे 'क्रिएटर्स मीट-अप' विशेष विभाग असणार आहे. २६ जुलै रोजी दु. १ ते २ वाजता आदिनाथ कोठारे यांच्या सोबत आदित्य पटवर्धन तर २७ जुलै रोजी वैदेही परशुरामी यांच्याशी हर्ष महाडेश्वर तरुण कलावंतांमधील कलागुणांच्या नवलाईबद्दल संवाद साधतील. यासोबतच व्हाईस आर्टिस्ट आणि अभिनेते प्रसाद फणसे यांचे दोन्ही दिवस 'डबिंग वर्कशॉप्स' सुरु राहणार असून ते 'जाहिरातींचे डबिंग', 'चित्रपटांचे डबिंग' आणि 'ऍनिमेशन फिल्मचे डबिंग' कसे करावे याबद्दल प्रशिक्षण देणार आहेत. यासोबतच फेस्टिव्हलमध्ये तिन्ही दिवस 'चित्रपट एक्स्पो' सुरु असणार आहे. या 'नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

अधिक माहितीसाठी व सविस्तर कार्यक्रम वेळापत्रकासाठी https://northamericanfilmassociation.org/ या संकेतस्थळास भेट द्यावी.


Marathi Film Festival, San Jose, California, NAFA, North American Marathi Film Association, Film Awards, Masterclass, Meet and Greet, Marathi Cinema, Abhijeet Gholap, Ashish Shelar

 #MarathiFilmFestival #NAFA #SanJose #California #MarathiCinema #FilmAwards #Masterclass #MeetAndGreet #IndianDiaspora #AbhijeetGholap #AshishShelar

५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव! ५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव! Reviewed by ANN news network on ७/२३/२०२५ ०४:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".