आजच्या कार्यक्रमाला अधिपती प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवडचे संस्थापक अध्यक्ष संदीप शिंदे, पातुर विकास मंच, जि. अकोला, संस्थापक अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस, महानुभाव संप्रदाय संपर्क प्रमुख सुरेश तळेकर, मानवत-पाथरी विकास मंच, जि. परभणी, संस्थापक अध्यक्ष युवराज नितीन चिलवंत, माजी गुप्तवार्ता अधिकारी ॲड. रमेश आण्णा उमरगे, भाजपा युवा नेते संतोष जाधव, संतोष चव्हाण, योग गुरु मल्लीनाथ कुंभार, कलावंत बजरंग पवार, टा शरद रोकडे, बाबरे, मेजर विनोद देवकुळे यांचे सुपुत्र सौरभ देवकुळे, रोहित शिंदे, शौर्य चिलवंत, कु. अदी वाळुंज, कु. वैभव देसाई, कु. रोशन वारंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमारसिंह बायस यांनी केले. नितीन चिलवंत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कारगिलचा रणसंग्राम आणि कारगिल विजय दिनाचा संदेश याविषयी सविस्तर माहिती दिली. ॲड. रमेश उमरगे यांनी देशभक्तीपर सुंदर कविता सादर केली, तर संतोष चव्हाण यांनी शेतकरी आणि सैनिक यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. संतोष जाधव यांनी राष्ट्रभक्ती आणि कारगिल विजयावर आपले विचार व्यक्त केले. आभार प्रदर्शन संदीप शिंदे यांनी केले.
आजच्या २७ जुलै या सीआरपीएफ स्थापना दिनानिमित्त देशांतर्गत शांतता आणि सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या सर्व सीआरपीएफ वीरांना मानवंदना देण्यात आली. तसेच, मिसाईल मॅन भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. राजे शिवाजीनगर, सेक्टर १६, जाधववाडी येथील अनेक देशभक्त नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Kargil Vijay Diwas, Patriotism, Homage to Martyrs, Chikhali, Pune, Adhipati Pratishthan, CRPF Foundation Day, APJ Abdul Kalam Death Anniversary
#KargilVijayDiwas #KargilMartyrs #Chikhali #Pune #Patriotism #IndianArmy #CRPF #APJAbdulKalam #Deshbhakti #JaiJawanJaiKisan

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: