'कपल्स थेरपी'वर भारती विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रशिक्षण

 


पुणे: नातेसंबंधांतील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि दांपत्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेज आणि फोर सी'ज (4 C’s) कौन्सिलिंग सेंटरने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'कपल्स थेरपी' (दांपत्य समुपदेशन) विषयावर ऑनलाइन प्रमाणपत्र प्रशिक्षण (Online Certificate Course) आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ, सोशल वर्कर्स तसेच नातेसंबंध अधिक सुधारू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी खुले आहे. १० ते १४ ऑगस्ट २०२५ दरम्यान दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत हा ऑनलाइन कोर्स घेण्यात येईल.

या प्रशिक्षणामध्ये नातेसंबंधातील भावनिक गुंतवणूक, संवादातील अडचणी, विश्वास आणि जवळीक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यात गोत्समन कपल थेरपीसह इतर प्रभावी थेरपी पद्धतींचाही अभ्यास केला जाईल. कोर्समध्ये सहभागी होणाऱ्यांना संवाद कौशल्ये, संघर्ष निवारण, केस स्टडी, रोल प्ले आणि सुपरविजनचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०२५ आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ७०२०७ ३५३३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्ज्वला बेंडाळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.


Couples Therapy, Online Training, Bharati Vidyapeeth, New Law College, Counseling, Relationship Guidance, Certificate Course Pune

 #CouplesTherapy #OnlineCourse #BharatiVidyapeeth #NewLawCollege #Pune #RelationshipCounseling #MarriageCounseling #OnlineTraining #PsychologyCourse

'कपल्स थेरपी'वर भारती विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रशिक्षण 'कपल्स थेरपी'वर भारती विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रशिक्षण Reviewed by ANN news network on ७/२७/२०२५ ०८:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".