पुणे: सीडीके इंडिया, या आघाडीच्या ऑटोमोटिव्ह रिटेल सॉफ्टवेयर पुरवठादार कंपनीने कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या आपल्या संस्कृतीला पुण्यातील 'कॉनर्व्हजन्स २०२५' या वार्षिक कौटुंबिक सोहळ्यात मध्यवर्ती स्थान दिले. गाणी, अविस्मरणीय क्षण आणि सर्वांच्या चेहऱ्यावरच्या हास्याने ही संध्याकाळ रंगली होती. या सोहळ्यात कंपनीचे कर्मचारी आपल्या कुटुंबासह सर्जनशीलता, परस्परांशी असलेले नाते आणि सामाजिक भावना साजरी करण्यासाठी सहभागी झाले होते.
उपस्थितांचे स्वागत करताना सीडीके इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप कुमार जैन यांनी कुटुंबाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. कुटुंबाची व्याख्या प्रत्येकाची भूमिका किंवा नावावरून ठरत नसून, तुमच्या पाठीशी उभे राहाणारे, तुम्हाला प्रोत्साहन देणारे आणि तुम्हाला स्वतःवर शंका वाटत असतानाही विश्वास दाखवणाऱ्यांवरून ठरत असते, असे ते म्हणाले. प्रत्येकाला या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी प्रेरणा देत त्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांबरोबर नृत्य करायला आणि सहकाऱ्यांच्या कुटुंबाशी कनेक्ट व्हायला आमंत्रित केले. एरवी टीम मीटिंगच्या नजरेतून एकमेकांकडे पाहणारे कर्मचारी या वेळी मनमोकळ्या हास्यासह खुलले होते.
या वेळी लाइव्ह परफॉर्मन्सेस तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणाचा उपस्थितांनी आनंद घेतला. मनमुराद संगीत, नृत्य, कला आणि खास स्किट्ससह सर्वजण विनोद व मनोरंजनात रंगले होते. भारताच्या सैनिकांना आदरांजली वाहणाऱ्या फिनाले परफॉर्मन्सनं ही संध्याकाळ नव्या उंचीवर नेली. या भावनिक परफॉर्मन्सने सर्वांना अनोख्या पर्वणीचा अनुभव दिला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली. सन्मान आणि पुरस्कार प्रदान सोहळ्यात वेगवेगळ्या पदांवरच्या व्यक्ती व टीम्सने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली, यातून कंपनीची प्रशंसा करण्याची संस्कृती ठळकपणे दिसून आली.
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या औपचारिक सन्मान सोहळ्यात सीडीके इंडियाच्या ह्युमन रिसोर्सेस विभागाचे वरिष्ठ संचालक श्री. आशिष सक्सेना यांनी पडद्यामागे राहात लक्षणीय योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेतली. कार्यक्रमाची सांगता 'मेकिंग ऑफ' व्हिडिओने झाली, ज्यात बॅकस्टेजवरचे क्षण, सर्वांनी केलेले प्रयत्न, हास्य आणि या कार्यक्रमाला अविस्मरणीय करणारी ऊर्जा यांची झलक पाहायला मिळाली. ग्रुप फोटो आणि आलिशान मेजवानीसह या अनोख्या सेलिब्रेशनची सांगता झाली.
Local News, Corporate Event, Employee Engagement, Community, Pune
#CDKIndia #Convergence2025 #PuneEvents #EmployeeEngagement #FamilyCelebration #CorporateCulture
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: