पुणे शहर, (२ जुलै): पुणे गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मोका) एका गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी संदीप गौतम केंदळे (वय ३८, रा. एसआरए बिल्डींग, विमानगर, पुणे व सिद्धार्थनगर, कुर्जुवाडी, सोलापूर) याला सोलापूर जिल्ह्यातील कुर्जुवाडी येथून अटक केली आहे.
गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुरजि.नं. ४८१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), १८९(२), १४३(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(३) सह आर्म अॅक्ट कलम ८(२५) आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(२), ३(७), ३(८) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात संदीप केंदळे हा पाहिजे होता. मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.
दिनांक २९ जून रोजी गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय माहितीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी संदीप गौतम केंदळे हा कुर्जुवाडी, सोलापूर येथे राहत आहे. या माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन तात्काळ पथकाला कुर्जुवाडी, सोलापूर येथे रवाना केले.
कुर्डवाडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे सिद्धार्थनगर, कुर्जुवाडी, सोलापूर येथून आरोपी संदीप केंदळेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने सुमारे दहा महिन्यांपूर्वी एसआरए बिल्डींगजवळ, विमानगर, पुणे येथे त्याच्या साथीदारांसह फिर्यादीकडे पैशाची मागणी करून मारहाण केल्याची कबुली दिली.
या यशस्वी कामगिरीमुळे पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ४, पुणे शहर येथील वरिष्ठ निरीक्षकअजय वाघमारे, उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा. उपनिरीक्षक सुहास जाधव, अंमलदार विनोद शिवले, विशाल वाघमारे, स्वप्नील जाधव, अनिल खुटाळे, संतोष खैरे, सचिन कदम, सुधीर डोळस आणि सचिन अडागळे यांनी केली.
MCOCA, Arrest, Fugitive, Pune Police, Organized Crime, Vimannagar, Solapur, Extortion
#PunePolice #MCOCA #CrimeNews #FugitiveArrest #Vimannagar #Solapur #OrganizedCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: