पुणे शहर, (२ जुलै): पुणे शहर, आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वर्षांपासून फरार असलेल्या मोका गुन्ह्यातील आरोपी सुनील संजय गायकवाड (वय २०, रा. अटल १०, सच्चाईमातानगर, दुगड शाळेजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे) याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार चेतन गोरे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुरनं ७९८/२०२३ भारतीय दंड संहिता कलम ३९५, ३२६, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६(२), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कलम ३ (९)(११), ३(R) व ३ (४) या गंभीर मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सुनील गायकवाड हा त्याच्या राहत्या घराजवळ मित्राला भेटण्यासाठी आला आहे.
या माहितीच्या आधारे तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता, नमूद इसम तिथे मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली.
ही कामगिरी आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर, अंमलदार श्री. शैलेंद्र साठे, श्री. चेतन गोरे आणि हणमंत मासाळ यांनी केली.
MCOCA, Fugitive, Arrest, Pune Police, Ambegaon, Organized Crime, Law Enforcement
#PunePolice #MCOCA #FugitiveArrest #Ambegaon #CrimeNews #OrganizedCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: