पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलात २२० अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन बचाव प्रशिक्षण

 


आधुनिक आपत्त्यांना सामोरे जाण्यासाठी १० विशिष्ट अभ्यासक्रम; तांत्रिक कौशल्ये वाढवण्यावर भर

पिंपरी, दि. १४ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तींचा सामना करण्यासाठी अग्निशमन विभागाने जुने आणि नवीन मिळून एकूण २२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन बचाव संबंधित प्रशिक्षण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत अग्निशमन विभागातील पूर्वीपासून कार्यरत असलेले ७० अनुभवी आणि १५० नव्याने नियुक्त अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन विभागाने एकूण १० विशिष्ट प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे कोर्सेस संबंधित कर्मचाऱ्यांच्या वयोगट, जबाबदाऱ्या आणि शारीरिक क्षमतांचा विचार करून तयार करण्यात आले आहेत.

हे अभ्यासक्रम १८ ते ५५ वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असून, त्यांचे आधुनिक तांत्रिक कौशल्य विकसित करणे हा मुख्य उद्देश आहे. अग्निशमन जवानांना आधुनिक आव्हानांसोबतच झाड कापण्यासाठी कटरचा योग्य वापर, पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य, ड्रोनच्या सहाय्याने हरवलेल्या व्यक्तींचा शोध, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीस सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे, मानसिक तयारी, सामूहिक कार्यशैली आणि आधुनिक उपकरणे हाताळणे याबाबतचे प्रात्यक्षिके करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. तसेच, यात प्राथमिक उपचार, जलदुर्घटना आणि बोट बचाव, उपकरणांची काळजी व देखभाल, उंचीवरील तसेच मर्यादित जागेतील बचाव पद्धती, खोल पाण्यातील डायव्हिंग, ड्रोन हँडलिंग ऑपरेशन आणि के ९ डॉग हँडलिंग अशा विविध कौशल्यांचा समावेश आहे.


  •  Pimpri-Chinchwad Fire Department to Train 220 Officers and Staff for Disaster Response

  •  Ten Specialized Courses to Enhance Technical Skills for Modern Disasters

 The Pimpri-Chinchwad Fire Department is launching a comprehensive disaster response training program for 220 personnel (70 experienced, 150 new recruits) to tackle both natural and man-made calamities. The program includes 10 specialized courses tailored to age, responsibilities, and physical capabilities, focusing on advanced technical skills like using cutting tools, water rescue, drone-assisted search, first aid, K9 dog handling, and operating modern equipment for effective disaster management in the city.

#PimpriChinchwad #FireDepartment #DisasterManagement #EmergencyServices #TrainingProgram #Firefighters #RescueOperations #SkillDevelopment #PublicSafety #ModernChallenges

पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलात २२० अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन बचाव प्रशिक्षण पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलात २२० अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन बचाव प्रशिक्षण Reviewed by ANN news network on ७/१५/२०२५ ०७:५५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".