नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणासाठी अपील करा - राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २४ जुलै २०२५: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत राज्यस्तरीय धार्मिक स्थळांच्या नियमती करण्यासंदर्भातील समितीकडे अपील दाखल करण्यात यावे, असे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
बैठकीचे आयोजन आणि उपस्थिती
मंत्रालयात नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्याअनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, उपसचिव सुशील पवार, सिडकोचे अतिरिक्त मुख्य नियोजन अधिकारी डॉ. पी.टी.गेडाम, सिडकोचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जगन्नाथ वीरकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अपीलांची सुनावणी आणि इतर विषय
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, अपिलार्थीकडून प्राप्त झालेल्या अपिलांची समितीमार्फत सुनावणीद्वारे निर्णय घेण्यात येईल. तसेच, यावेळी बेलापूर येथील अनाधिकृत बांधकाम, अतिक्रमणे आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. श्रीमती मिसाळ यांनी बेलापूर किल्ला संवर्धन आणि मरिना प्रकल्पाचाही आढावा घेतला.
Navi Mumbai, Religious Sites, Regularization, State Minister Madhuri Misal, Urban Development, Belapur, Unauthorized Construction, Encroachment, CIDCO
#NaviMumbai #ReligiousSites #Regularization #MadhuriMisal #UrbanDevelopment #Maharashtra #Belapur #CIDCO #UnauthorizedConstruction

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: