पुणे, दि. २४ जुलै: पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करून त्यांच्या मायदेशी हकालपट्टी केली आहे. २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.
कारवाईचा तपशील: पिंपरी चिंचवड पोलिसांच्या
गुन्हे शाखा युनिट चारने मिळालेल्या माहितीनुसार, वाकड येथील भुजबळ चौकातून मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी भारतीय असल्याचा दावा केला; मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे दिसून आले. मोहम्मद उस्मान अली शेख (४०), मोहम्मद अब्दुल्ला मुला शगरमुल्ला (२२), मोमीन हरून शेख (४०), जहांगीर बिल्ला मुल्ला (३५), मोहम्मद इलाहिन बिश्वास इलियाज बिश्वास (१९), तोहीद हसन मुस्लिम शेख (३१) अशी या घुसखोरांची नावे आहेत. दिनांक २२ जुलै रोजी त्यांना लोहगाव (पुणे) विमानतळावरून गुवाहाटी येथे नेण्यात आले. त्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या देखरेखीखाली विशेष विमानाने त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आले.
Deportation, Bangladeshi Nationals, Illegal Immigrants, Pimpri Chinchwad Police, Crime Branch, Arrest
#Deportation #BangladeshiNationals #PimpriChinchwadPolice #IllegalImmigrants #PunePolice #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: