गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपतर्फे ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस समिट अँड अवॉर्ड्सचे आयोजन; आरोग्यदायी कार्यस्थळांसाठी जागतिक मंच
मुंबई, १८ जुलै २०२५: गोदरेज इंडस्ट्रीज समूहाने ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस (GCHW) आणि आरोग्य वर्ल्ड यांच्यासह भागिदारी केली असून, २० आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी 'गोदरेज वन', मुंबई येथे ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस समिट अँड अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय प्रतिष्ठित कार्यक्रमात कामाच्या ठिकाणच्या आरोग्याशी संबंधित नव्या मापदंडांविषयी संवाद साधला जाणार असून, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व स्वास्थ्यावर कायमस्वरूपी लक्ष केंद्रित करणाऱ्या भारत आणि जगभरातील आघाडीच्या कंपन्यांचा सन्मान केला जाईल.
भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील समिट
ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस समिट अँड अवॉर्ड्सचे भारतात पहिल्यांदाच आयोजन केले जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय लीडर्स, आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ, औद्योगिक संघटना, पॉलिसीमेकर्स आणि कंपन्या एकत्र येऊन कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व स्वास्थ्यासाठी अत्याधुनिक धोरणांविषयी चर्चा करणार आहेत. ही कॉन्फरन्स ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस आणि आरोग्य वर्ल्ड या भारतातील वर्कप्लेस हेल्थ क्षेत्रातील आघाडीच्या, नॉन-प्रॉफिट कंपनीसह भागिदारीमध्ये आयोजित केली जात आहे. भारतात यापूर्वी झालेल्या आरोग्य वर्ल्ड समिट्सने दिलेल्या शिकवणीच्या पायावर ही कॉन्फरन्स आधारित आहे.
कामाचे भविष्य, एआय आणि ईएसजी यावर चर्चा
या समिटमध्ये कामाचे भविष्य, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वर्कप्लेसमधील समावेश आणि ईएसजी (एन्व्हॉरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स) उद्दिष्टांची आरोग्यसेवा पद्धतींशी सुसंगती इत्यादी विषयांचा समावेश असेल. यावर्षीच्या समिटने वर्कप्लेस वेलनेस क्षेत्रात नवे जागतिक मापदंड प्रस्थापित केले आहेत. या समिटमध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व स्वास्थ्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या भारतातील आघाडीच्या कंपन्यांना पुढे आणले जाईल, तसेच २०२५ मधील जगातील सर्वात निरोगी वर्कप्लेसेसची माहिती दिली जाईल.
गैरसंसर्गजन्य रोग आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित
नॉन-कम्युनिकेबल डिसीजेसना (NCD) प्रतिबंध, मानसिक आरोग्यासाठी पाठिंबा आणि स्वास्थ्याचा कंपनीच्या धोरणांमध्ये समावेश अशा विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या समिटमध्ये जगभरातील आरोग्याशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण आव्हाने व संधी तसेच भारतीय परिस्थितीची वैशिष्ट्ये यांवर चर्चा केली जाईल. या कॉन्फरन्समध्ये पुराव्यासह कॉर्पोरेट वेलनेस उपक्रम आणि आरोग्य वर्ल्डच्या मायथाली न्युट्रिशन प्रोग्रॅम, लाइफस्टाईल कोच ट्रेनिंग प्रोग्रॅम, टोबॅको-फ्री वर्कप्लेस धोरणांसह इतर सर्वोत्तम पद्धतींचा समावेश केला जाणार आहे.
भागीदार कंपन्यांची मते
गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे ग्रुप हेड कॉर्पोरेट सर्व्हिस, अजय भट्ट म्हणाले, 'गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये आम्ही कायमच पारंपरिक पद्धतींपलीकडे जात आरोग्य व स्वास्थ्याला चालना देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सची गरज असल्याचा प्रसार केला आहे. ही भागिदारी हेल्दी वर्कप्लेसवर भर देण्याच्या आमच्या संस्कृतीशी सुसंगत आहे.' ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेसचे मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स डिरेक्टर बॅरी क्रिस्प म्हणाले, 'कर्मचाऱ्यांचे स्वास्थ जपण्याची सुरुवात करण्यासाठी आजची वेळ योग्य आहे. मुंबईत आमच्या १३ व्या ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस अवॉर्ड्स अँड समिटचे आरोग्यवर्ल्ड व गोदरेज इंडस्ट्रीसह आयोजन करणं ही आरोग्याविषयी जागरूक संस्कृतीला चालना देत संबंधित जागतिक पद्धती शेअर करण्याची जबरदस्त संधी आहे. 'गुड हेल्थ इज गुड बिझनेस' या तत्वावर आमचा विश्वास आहे.' आरोग्य वर्ल्डच्या चीफ ऑफ प्रोग्रॅम्स श्रीमती स्रबानी बॅनर्जी म्हणाल्या, 'कर्मचाऱ्यांच्या समग्र स्वास्थ्याशी बांधिलकी जपत आरोग्य वर्ल्डमध्ये आम्ही इतर कंपन्यांना आरोग्याची संस्कृती रुजवण्यासाठी मदत करतो. ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस आणि गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप यांच्यासह भागिदारी करून हा संवाद जागतिक पातळीवर नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.' या भागिदारींमुळे सर्वोत्तम पद्धती शेअर करण्यासाठी, नवे ट्रेंड्स समजून घेण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी आरोग्य धोरणे व पद्धतींवर आधारित अर्थपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळेल.
Godrej Industries Group, Global Healthy Workplace Summit & Awards, Global Centre for Healthy Workplaces, Arogya World, Workplace Wellness, Employee Health, Mumbai, Healthcare, Corporate Social Responsibility, AI in Workplace, ESG
#Godrej #WorkplaceWellness #HealthyWorkplace #Mumbai #EmployeeHealth #ArogyaWorld #GlobalSummit #Healthcare #CorporateWellness #ESG
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: