पुणे, दि. २४ जुलै २०२५: मुळशी धरण ७९.७४% भरले असून, सध्या पाऊस कमी/अधिक प्रमाणात होत आहे. धरणाच्या पाणी पातळीचे नियमन करण्यासाठी, मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत दुपारी २:०० वाजता २५०० क्युसेक (Cusecs) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. टाटा पॉवरच्यावतीने सुरेश कोंडूभैरी यांनी ही माहिती दिली.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पाऊस चालू/वाढत राहिल्यास आणि धरणातील येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी/जास्त करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. त्यामुळे, सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये. तसेच, नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात आणि सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Mulshi Dam, Pune, Water Discharge, Mula River, Tata Power, Monsoon, Flood Alert, Public Safety, Maharashtra
#MulshiDam #MulaRiver #Pune #Monsoon #WaterRelease #FloodAlert #PublicSafety #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: