उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार कार्यक्रम; दत्तवाडी येथे सायंकाळी ७ वाजता सोहळा
पुणे, ११ जुलै २०२५: रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने 'वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा' आज, शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे.
दत्तवाडी कमानी शेजारी, म्हात्रे ब्रिज जवळ, दत्तवाडी, पुणे ४११०३० येथील रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या 'ग्राउंड झिरो' येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा वाद्यपथकासाठी एक महत्त्वपूर्ण सुरुवात असून, या निमित्ताने नवीन सत्राच्या सरावालाही प्रारंभ होणार आहे.
रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट आणि अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) यांनी सर्वांना या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: