महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार, नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते. यानुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग', आणि 'ह' या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी सभेचे अध्यक्षपद भूषवले.
आजच्या जनसंवाद सभेत विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये 'अ' क्षेत्रीय कार्यालयात ७, 'ब' मध्ये ९, 'क' मध्ये ८, 'ड' मध्ये १४, 'इ' मध्ये ९, 'फ' मध्ये ४, 'ग' मध्ये ६, आणि 'ह' क्षेत्रीय कार्यालयात १५ अशा एकूण ७२ तक्रारी व सूचना प्राप्त झाल्या.
यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतुकीला होणारा अडथळा, ठिकठिकाणी पडणारा कचरा, पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे, तुंबलेल्या गटारांची साफसफाई, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची उपलब्धता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पूर्तता, महापालिका दवाखान्यांमधील सेवा-सुविधा, रस्त्यांवर वाढलेल्या भिकाऱ्यांची संख्या अशा विविध तक्रारी मांडल्या. या जनसंवाद सभेमुळे नागरिकांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
Pimpri Chinchwad Municipal Corporation, Jan Samvad Sabha, Citizen Grievances, Public Feedback, Civic Issues, Shekhar Singh, Pune
#PimpriChinchwad #PCMC #JanSamvadSabha #CitizenGrievances #CivicIssues #Pune #LocalGovernance #PublicFeedback

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: