आढावा बैठकीतील प्रमुख मुद्दे आणि सूचना
यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस उपाधीक्षक (गृह) सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहायक पोलीस निरिक्षक तथा नोडल स्वाती यादव यांच्यासह संबंधित इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या प्रमुख सूचना:
तक्रार दाखल करून घेण्याचे प्राधान्य: महिलांवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी प्राधान्याने तक्रार दाखल करून घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. तपास प्रक्रिया त्यानंतर सुरु होते, परंतु या काळात अत्याचारग्रस्त महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून संबंधित आरोपीवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली पाहिजेत.
निर्भया पथक आणि भरोसा सेलचा प्रभावी वापर: निर्भया पथक आणि भरोसा सेलचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोपींवर कठोर कारवाई: अत्याचार प्रकरणात आरोपी वारंवार न्यायालयात गैरहजर राहत असेल तर वॉरंटसाठी प्रक्रिया त्वरीत राबवावी. समाजात काही आरोपी बिनधास्त वावरताना दिसतात, हे पीडित महिलांसाठी मानसिक त्रासदायक ठरते. त्यामुळे अशा आरोपींना कायद्याची कठोर जाणीव करून देणे गरजेचे आहे.
जनजागृती मोहिम: जिल्ह्यात महिलांसह तृतीयपंथीयांसाठी जनजागृती मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्या.
हिरकणी कक्ष, विधवा प्रथा आणि बालविवाह: 'हिरकणी कक्ष' कार्यरत असल्याची खात्री घेणे, तसेच विधवा प्रथा आणि बालविवाहविरोधी ठराव ग्रामसभेच्या माध्यमातून मंजूर करून घेण्यावर त्यांनी भर दिला.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, महिला लोकशाही दिन, भरोसा सेल, निर्भया पथक, महिला हेल्पलाईन आदी योजनांचा आढावा यावेळी सादर करण्यात आला.
शाळांमध्ये विशेष गस्त आणि युवकांचे प्रबोधन
शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळा सुरु आणि सुटण्याच्या वेळेत विशेष गस्त ठेवावी, अशा सूचना अध्यक्षा चाकणकर यांनी दिल्या. मात्र, हा उपाय केवळ मुलींच्या सुरक्षेसाठी नसून तरुण मुलांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्याचा उद्देश ठेवून करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra State Commission for Women, Rupali Chakankar, Kolhapur Police, Women's Rights, Justice for Women, Nirbhaya Squad, Bharosa Cell, Awareness Programs, Gender Equality, Child Marriage, Widow Customs
#RupaliChakankar #WomenEmpowerment #JusticeForWomen #KolhapurPolice #NirbhayaSquad #BharosaCell #GenderEquality #Maharashtra #WomensRights
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: