खराडी पोलिसांचे "मिशन मोबाईल रिटर्न"; नागरिकांना दिलासा

 


पुणे, ३० जुलै २०२५  : खराडी पोलिसांनी हरवलेले १५ मोबाईल फोन परत मिळवून नागरिकांना सुपूर्द केले आहेत, ज्यांची एकूण किंमत लाख ८३ हजार रुपये आहे.  यामुळे नागरिकांनी खराडी पोलीस स्टेशनचे कौतुक करून आभार मानले आहेत.  

 खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी खराडी पोलीस स्टेशनमध्ये दिल्या होत्या.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी या गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.  

 या सूचनांनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत जगताप, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, आणि तपास पथकातील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करणारे पोलीस अंमलदार सुरज जाधव यांनी तपास हाती घेतला.  सायबर पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी बिडवे आणि सायबर तपास पथकातील अंमलदार यांनीही या कामात सहभाग घेतला.  

 या तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, तसेच नांदेड, सोलापूर, अहमदनगर (अहिल्यानगर), उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यांमधून एकूण १५ मोबाईल फोनचा शोध घेतला.  हे सर्व फोन वेगवेगळ्या कंपन्यांचे असून त्यांची किंमत लाख ८३ हजार रुपये आहे.  तपास पथक आणि सायबर पथकाला हे फोन मिळवण्यात यश मिळाले असून ते नागरिकांना परत करण्यात आले आहेत.  

 ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील;  पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ , श्री सोमय मुंडे;  आणि सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत जगताप, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश नानेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत शेंडे, वसीम सय्यद, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, जयवंत श्रीरामे, विलास केदारी, आणि सायबर तपास पथकातील महिला पोलीस अंमलदार श्रीमती प्रतिभा पवार यांनी ही कामगिरी यशस्वी केली.  

Public Service, Police Action, Mobile Recovery, Community News, Pune Police 

#KharadiPolice #MobileRecovery #PunePolice #GoodNews #CommunityService #LostAndFound #MaharashtraPolice

 


खराडी पोलिसांचे "मिशन मोबाईल रिटर्न"; नागरिकांना दिलासा खराडी पोलिसांचे "मिशन मोबाईल रिटर्न"; नागरिकांना दिलासा Reviewed by ANN news network on ७/३०/२०२५ ०२:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".