पुणे, ३ जुलै २०२५: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने धरणांमधून येणाऱ्या पाण्यात गढूळपणा वाढला आहे. पहिल्या पावसामुळे पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात माती वाहून येत असल्याने पाण्याची गुणवत्ता प्रभावित झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी उकळून आणि निवळून पिण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) नंदकिशोर जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड, नांदोशी, किरकीटवाडी, खडकवासला, सणसनगर, धायरी, नऱ्हे या नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्यावर प्रक्रिया न करता, केवळ निर्जंतुकीकरण (disinfection) करून पाणी पुरवले जाते. यामुळे या भागातील नागरिकांनी पाणी पिण्यापूर्वी तुरटीचा वापर करून निवळून आणि उकळून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शहराच्या इतर भागांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रांमधून (Water Treatment Plants) सर्व आवश्यक शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणी पुरवले जाते. तरीही, काही वेळा जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त गढूळ पाणी आल्यास, नागरिकांना मिळणाऱ्या पाण्यातही अल्प प्रमाणात गढूळता राहू शकते. अशा परिस्थितीतही नागरिकांनी पिण्यासाठी पाणी तुरटीचा वापर करून, निवळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.
Pune, Water Supply, Monsoon, Water Quality, Public Health, Pune Municipal Corporation, Water Treatment, Health Advisory
#Pune #Monsoon #WaterQuality #PMC #PublicAdvisory #BoilWater #DrinkingWater #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: