पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एक विक्रम; देशातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे नेते ठरले

 


नवी दिल्ली, दि. २५ जुलै २०२५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होण्याचा मान पटकावला आहे. ही कामगिरी करणारे ते पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान ठरले आहेत. त्याचसोबत स्वातंत्र्यानंतर जन्मलेले आणि बिगर हिंदी राज्यातून आलेले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाची नोंद

पंतप्रधान मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीस आजमितीस ११ वर्ष साठ दिवस झाली आहेत. यापूर्वी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ अशी सलग ११ वर्ष ५९ दिवस पंतप्रधानपद भूषवले होते. नरेंद्र मोदी यांनी आता इंदिरा गांधींचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले नेते

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु सर्वाधिक १६ वर्ष २८६ दिवस सलग पंतप्रधान पदावर राहिले होते. या विक्रमाशी सध्या तरी कोणीही स्पर्धा करू शकलेले नाही.


Narendra Modi, Prime Minister, India, Political Record, Indira Gandhi, Jawaharlal Nehru, Longevity in Office, Indian Politics, BJP, National Leader

#NarendraModi #PrimeMinister #IndianPolitics #RecordBreaker #PMO #BJP #IndiraGandhi #JawaharlalNehru #India

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एक विक्रम; देशातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे नेते ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एक विक्रम; देशातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे नेते ठरले Reviewed by ANN news network on ७/२५/२०२५ ०९:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".