श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड

 

प्रांतपाल संतोष मराठे यांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ उत्साहात 

पिंपरी, पुणे, दि. १२ जुलै २०२५: तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. क्लबचा ३३ वा पदग्रहण सोहळा नुकताच तळेगाव येथे उत्साहात संपन्न झाला.

सन २०२५-२६ वर्षासाठी अध्यक्ष म्हणून रो. श्रीशैल मेंथे, उपाध्यक्ष रो. प्रमोद दाभाडे, सचिव प्रसाद मुंगी आणि इतर १७ कार्यकारी सदस्यांनी प्रांतपाल संतोष मराठे यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला. यावेळी सहायक प्रांतपाल विन्सेंट सालेर यांचीही विशेष उपस्थिती होती.

'उल्लेखनीय काम करण्याचा विश्वास': प्रांतपाल संतोष मराठे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, "रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आपल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे एक नावलौकिक असलेला क्लब आहे. आता अध्यक्ष श्रीशैल मेंथे आणि त्यांची टीम येणाऱ्या वर्षात उल्लेखनीय काम करतील, असा मला विश्वास आहे."

मेंथेंनी व्यक्त केला कृती संकल्प: 

आपली भावना व्यक्त करताना श्रीशैल मेंथे म्हणाले की, "सामुदायिक विवाह सोहळा या सामाजिक उपक्रमाचा आदर्श घेत विविध संस्थांनी असे उपक्रम सुरू केले आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो." त्यांनी येत्या वर्षात शव दाहिनी प्रकल्प, आरोग्य व पर्यावरण पूरक प्रकल्प, गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत, आरोग्य शिबिर, गाव दत्तक योजना आणि गर्भाशय कर्करोग तपासणी असे विविध उपक्रम सर्वांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेण्याचा विश्वास व्यक्त केला. माजी अध्यक्ष कमलेश कार्ले यांनीही नवीन कमिटीला शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यात डिस्ट्रीक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो. विवेक दिक्षीत यांच्या उपस्थितीत क्लबमध्ये ४ नवीन सदस्यांना रोटरी पिन देऊन सदस्यत्व प्रदान करण्यात आले. कल्याणी मुंगी व त्यांच्या टीमने तयार केलेल्या बुलेटिनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, क्लबच्या ३२ वर्षांच्या कालखंडातील सक्रिय माजी अध्यक्षांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रसाद मुंगी यांनी सचिव पदाची घोषणा केली. नीलिमा बारटक्के व राजेंद्र पोळ यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष प्रमोद दाभाडे यांनी आभार मानले. पदग्रहण समारंभ चेअरमन उद्धव चितळे, फेलोशिप चेअरमन गिरीश जोशी आणि ॲन्स मीट चेअरमन अर्चना चितळे यांनी कार्यक्रम संयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड Reviewed by ANN news network on ७/१२/२०२५ ०६:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".