विविध राज्यांतील पारंपरिक वस्त्रप्रकारांची आकर्षक मांडणी; १४ जुलैपर्यंत विनामूल्य प्रवेश
कलाकारांच्या कलेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश; आयोजकांचे नागरिकांना आवाहन
पुणे, ११ जुलै २०२५: कोथरुडमधील हर्षल बँक्वेट हॉल येथे ९ जुलैपासून सुरू झालेल्या 'दस्तकारी हाट एक्स्पो' या देशभरातील हातमाग व वीण कारागिरांच्या कलेच्या अनोख्या प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात विविध राज्यांतील पारंपरिक हस्तकलेचे वस्त्रप्रकार, कपडे व वस्तूंची खास मांडणी करण्यात आली आहे.
प्रदर्शनातील आकर्षक वस्तू:
या प्रदर्शनात टसर, आरी सिल्क, मर्सिलीन (भागलपूर), कातण, मुंगा, ऑर्गंझा, टिस्यु (बनारस), बांधणी, ब्लॉक प्रिंट (राजस्थान), कांठा वर्क, जामदानी, कडवा (कोलकाता), अजरक, शिबोरी (गुजरात), चंदेरी (म. प्र.), तसेच आसाम व काश्मीरमधील खास रेशमी वस्त्रप्रकारांची झलक पाहायला मिळते. येथे कलाकुसरीच्या साड्या, शाली, कुर्ती, ड्रेस मटेरीअल, कार्पेट, बेडशिट्स यांची आकर्षक रेलचेल असून, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या या वस्त्रप्रदर्शनात सणासुदीच्या दिवसांसाठी उपयुक्त कपड्यांची खरेदी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे.
प्रदर्शनाचा उद्देश आणि कालावधी:
हातमाग व वीणकलेचे संवर्धन, तसेच कारागिरांच्या कलेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन १४ जुलै २०२५ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे. प्रवेश विनामूल्य असून, आयोजकांनी पुणेकरांना या कलाविष्काराचा अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: