मुंबई: आग्रीपाडा पोलीस
ठाणे हद्दीत २८
जून २०२५ रोजी
एका घरफोडीत २३.५० ग्रॅम वजनाचे,
एकूण १,८८,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे विविध
दागिने लंपास करण्यात आले
होते. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा
नोंदवला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज
आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे
पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले
आहे.
या आरोपींमध्ये अरबाज
अली मोहसिन अली
मलिक (वय २७),
नबिल नसुरुद्दीन सिद्दिकी (वय
२५) आणि नितेश
हेमराज जैन (वय
४६) (सोनार) यांचा
समावेश आहे. विशेष म्हणजे, आरोपी
क्रमांक १, अरबाज अली
मोहसिन अली मलिक
हा तडीपार गुन्हेगार असून,
त्याच्यावर निर्मलनगर पोलीस ठाण्यात ११
गुन्हे, नालासोपारा पोलीस
ठाण्यात १० गुन्हे, पायधुनी पोलीस
ठाण्यात ०२ गुन्हे, बांद्रा पोलीस
ठाण्यात ०५ गुन्हे, दादर
पोलीस ठाण्यात ०१
गुन्हा, आणि वडाळा
पोलीस ठाण्यात ०१
गुन्हा असे एकूण
३० पेक्षा जास्त
गुन्हे दाखल आहेत.
आरोपींकडून ७६,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने,
१,३५,०००/-
रुपये किमतीची एक
मोटारसायकल, आणि ९,०००/-
रुपये किमतीचा एक
मोबाईल फोन जप्त
करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील इतर
आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३
आणि सहाय्यक पोलीस
आयुक्त, वरळी विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली,
आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक, पोलीस
निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलीस
निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक आणि
पोलीस अंमलदार यांच्या पथकाने
ही कामगिरी केली.
Crime, Burglary, Mumbai Police
#MumbaiCrime #Agripada #Housebreaking #GoldTheft #MumbaiPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: