महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे पुण्यात महिंद्रा सिटाडेलमध्ये नवीन टॉवरची उभारणी

 


२५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा भाग

पिंपरी-चिंचवडमध्ये तरुण व्यावसायिक आणि छोट्या कुटुंबांसाठी प्रीमियम १ बीएचके घरे 

पुणे, ०७ जुलै २०२५: महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा असलेल्या महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल) ने पिंपरी-चिंचवड, पुणे येथील महिंद्रा सिटाडेलमध्ये नवीन टॉवरच्या उभारणीची घोषणा केली आहे. तरुण व्यावसायिक, छोटी कुटुंबे आणि प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी डिझाइन केलेली प्रीमियम १ बीएचके घरे या टॉवरमध्ये उपलब्ध असतील. हा टॉवर सुमारे ९.६६ एकरच्या निवासी विकास प्रकल्पाचा एक भाग असून, त्याचे एकूण ग्रॉस डेव्हलपमेंट मूल्य (GDV) जवळपास २५०० कोटी रुपये आहे.

पिंपरी-चिंचवड हे उच्च क्षमतेचे निवासी मायक्रो-बाजारपेठ – महिंद्रा लाइफस्पेस 

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी (रेसिडेन्शियल) श्री. विमलेन्द्र सिंग यांनी या घोषणेप्रसंगी सांगितले, “महिंद्रा सिटाडेलमधील सातत्यपूर्ण मागणी आणि जोरदार विक्रीमुळे पिंपरी-चिंचवड ही उच्च क्षमतेची निवासी मायक्रो-बाजारपेठ आहे, यावर आमचा विश्वास दृढ झाला आहे. फेज १ आणि फेज २ मधील बहुतेक घरांची विक्री झाल्यामुळे आता आम्ही खास १ बीएचके पर्याय सादर करत आहोत, त्यायोगे घर खरेदीदारांच्या विस्तृत गटापर्यंत आमची पोहोच वाढेल. सोयी, कनेक्टिव्हिटी आणि आराम यांचा समतोल साधणाऱ्या दर्जेदार वास्तव्याच्या जागा सादर करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण बांधिलकीत आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे."

उच्च दर्जाची जीवनशैली आणि उत्कृष्ट दळणवळण सुविधा 

हा नवीन सादर केलेला टॉवर एकात्मिक समुदायाचा भाग असून, यामध्ये विचारपूर्वक आखलेल्या पायाभूत सुविधा आणि सोयी सुविधांचा समावेश आहे. लँडस्केप केलेली हरित क्षेत्रे, क्लबहाऊस, जॉगिंग ट्रॅक, जिम्नेशियम, मल्टीपर्पज कोर्ट्स आणि समर्पित वेलनेस स्पेसेस यांमध्ये उपलब्ध असतील. मागील टप्प्यांप्रमाणेच, या टॉवरमधील घरे देखील IGBC Gold pre-certified असून, त्यामध्ये ऊर्जासंवर्धन करणारे लाइटिंग, पाण्याच्या बचतीची यंत्रणा आणि घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था यांसारखी पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये असतील. संत तुकाराम मेट्रो स्थानकाजवळ असल्यामुळे उत्कृष्ट दळणवळण सुविधा येथे उपलब्ध आहेत. जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेले हे स्थान शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा केंद्रे आणि मनोरंजन स्थळे यांच्या जवळ असल्यामुळे आणखी आकर्षक बनले आहे.

 Mahindra Lifespaces, Mahindra Citadel, Pune Real Estate, Pimpri Chinchwad, New Residential Project, 1 BHK Homes, Property Development, Sustainable Living

 #MahindraLifespaces #PuneRealEstate #MahindraCitadel #PimpriChinchwad #RealEstate #1BHK #NewProject #PuneHomes #SustainableLiving

महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे पुण्यात महिंद्रा सिटाडेलमध्ये नवीन टॉवरची उभारणी महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे पुण्यात महिंद्रा सिटाडेलमध्ये नवीन टॉवरची उभारणी Reviewed by ANN news network on ७/०७/२०२५ ०९:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".