पुणे, दि. २२ जुलै - पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ५ ने घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
पुणे
शहरातील पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध
घेऊन संबंधित पोलीस
ठाण्यांकडे त्यांना हस्तांतरित करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले
होते. त्यानुसार, गुन्हे
शाखा युनिट ५
च्या पोलीस अंमलदार नासेर
देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून, पोलीस
पथकाने पाहिजे असलेले
आरोपी १) बिरजुसिंग रजपुतसिंग दुधाणी
(वय ४०, रा.
रामटेकडी, हडपसर, पुणे), २)
करणसिंग रजपुतसिंग दुधाणी (वय २८,
रा. रामटेकडी, हडपसर,
पुणे) आणि ३)
बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी (वय २८, रा.
रामटेकडी, हडपसर, पुणे) यांना
रामटेकडी परिसरातून ताब्यात घेतले.
बिरजुसिंग दुधाणी
आणि करणसिंग दुधाणी
यांना हडपसर पोलीस
ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे, तर
बिंतुसिंग कल्याणी याला विश्रांतवाडी पोलीस
ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे,
आरोपी बिरजुसिंग दुधाणी
हा एकूण चार
गुन्ह्यांमध्ये
पाहिजे होता आणि
तो सुमारे आठ
वर्षांपासून पोलिसांना चकमा देत होता.
सदरची
कामगिरी अपर पोलीस आयुक्त
(गुन्हे) पुणे शहर,
श्री. पंकज देशमुख,
आणि पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Burglary, Wanted Suspects, Arrest, Pune Crime, Hadapsar Police, Vishrantwadi Police, Crime Branch Unit 5
#Burglary #PuneCrime #Arrest #CrimeBranch #WantedSuspects #Hadapsar #Vishrantwadi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: