विश्वजीत बारणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा; आरोग्य शिबिरांपासून अन्नदानापर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, दि. २५ जुलै २०२५: युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव आणि युवा नेते विश्वजीत बारणे यांचा वाढदिवस आरोग्य शिबिर, छत्री आणि वृक्ष वाटप, अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक जल्लोषाऐवजी समाजोपयोगी कार्यांना प्राधान्य देत विश्वजीत बारणे यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
आरोग्य शिबिरे आणि छत्री वाटप
विश्वजीत बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना पिंपरी-चिंचवड शहर, सागर पाचार्णे, तसेच मेडीकव्हर हॉस्पिटल, भोसरी आणि डी.वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरात ९० दिवस विविध सोसायट्यांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. तसेच, थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे गार्डन येथे सुमारे ३००० छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
अन्नदान आणि वृक्षारोपण
डांगे चौक, थेरगाव येथे प्रशांत दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष राजेंद्र तरस, शहर प्रमुख निलेश तरस, युवासेना शहर प्रमुख माऊली जगताप, जिल्हा प्रमुख युवती सेना सरिता साने, सायली साळवी, नगरसेवक प्रमोद कुटे, निलेश बारणे, युवासेना पुणे महानगर प्रमुख राजेश पळसकर, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॉयल इशाना सोसायटी येथे विशेष वृक्षवाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, या उपक्रमात नागरिकांना विविध प्रकारची फळझाडे आणि शोभिवंत वृक्ष वाटण्यात आले. सर्वांनी मिळून वृक्षारोपणाची जबाबदारी स्वीकारली. हा उपक्रम हरित परिसर निर्माण करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला. विश्वजीत बारणे यांनी थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांसोबतही आपला वाढदिवस साजरा केला.
सामाजिक बांधिलकी आणि नियोजन
वाढदिवसानिमित्त, सामाजिक बांधिलकी जपत विक्रम झेंडे यांच्या वतीने चिंचवड परिसरात अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा, चिंचवड येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला. याव्यतिरिक्त, लोणावळा येथील अंध वृद्धाश्रमात फळांचे वाटप करण्यात आले. लोणावळा युवकचे अध्यक्ष विवेक भांगरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन सुजित कांबळे (गणेश नगर), अक्षय परदेशी (दुर्गा कॉलनी), संग्राम धायरीकर (शिव कॉलनी), निखील इंगोले, सौरभ माळवकर (मंगल नगर), अमित भोंडवे (हायलाईफ सोसायटी), सुदर्शन जाडकर (रुणवाल सोसायटी), महेश गोटे (आनंद पार्क), संतोष गुलाब बारणे (थेरगाव), रोहित बारणे (दगडू पाटील नगर), रितू कांबळे (थेरगाव), बाळा दळवी (थेरगाव), मंदार येळवंडे (दत्तनगर), सुरज बारणे (थेरगाव), प्रशांत करडे (गुजर नगर), विक्रम झेंडे (हिरामण बारणे चाळ) आणि सम्राट मित्र मंडळ व कार्यकर्त्यांनी केले.
Pimpri-Chinchwad, Vishwajit Barne, Yuva Sena, Birthday Celebration, Social Initiatives, Health Camp, Tree Plantation, Food Donation, Umbrella Distribution, Community Service
#VishwajitBarne #PimpriChinchwad #YuvaSena #BirthdayCelebration #SocialWork #HealthCamp #TreePlantation #FoodDonation #CommunityService #MaharashtraPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: