दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहायक एसीबीच्या जाळ्यात

 


दौंड : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे घटकाने दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहायक श्री. विजयकुमार मधुकर हावशेट्टे (वय ३१) यांच्याविरुद्ध लाच मागणी प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. एका पेट्रोलपंप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी हावशेट्टे यांनी तक्रारदाराकडून सुरुवातीला लाख रुपये, तर तडजोडीअंती .५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.  या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, सन १९८८ च्या कलम , अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.   

 तक्रारदाराने (पुरुष, वय ३६) बीपीसीएल कंपनीकडे पेट्रोलपंप डीलरशिपसाठी अर्ज केला होता. या पंपाच्या उभारणीसाठी मौजे दौंड येथील सर्व्हे नंबर २०२/ ही श्री.  लालचंद लुंड (वय ७३) यांच्या मालकीची जागा त्यांनी वीस वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतली होती.  या जागेवर पेट्रोलपंप उभारणीसाठी दौंड नगरपरिषदेची NA परवानगी आणि बांधकाम परवाना आवश्यक होता. श्री. लुंड यांनी दि.  ०२/०१/२०२५ रोजी नगरपरिषदेकडे या परवानग्यांसाठी अर्ज केला होता. श्री.  लुंड हे वयोवृद्ध असल्याने त्यांनी तक्रारदाराला या कामासाठी कुलमुखत्यार पत्र दिले होते.   

दि.  ०३/०१/२०२५ रोजी, आरोपी विजयकुमार हावशेट्टे यांनी जागेची पाहणी केली.  त्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपासाठी आवश्यक असणारा सर्वे अहवाल, टेनटिट्यूव लेआउट, फायनल लेआउट आणि बांधकाम परवाना मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या घटनेनंतर तक्रारदाराने दि.  १०/०१/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली.   

या तक्रारीच्या अनुषंगाने दि.  १४/०१/२०२५ रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली. या पडताळणीदरम्यान, विजयकुमार हावशेट्टे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडे नियोजित पेट्रोलपंपासाठी लागणारे टेनटिट्यूव लेआउट आणि फायनल लेआउट मंजूर करून देण्यासाठी स्वतःसाठी आणि दौंड नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री.  विजय कावळे यांच्यासाठी सुरुवातीला लाख रुपयांची लाच मागितली.  नंतर तडजोडीअंती लाख ५० हजार रुपयांची लाच मागणी करून, ती लाच रक्कम स्वीकारण्यास तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.   

ही कारवाई अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, आणि अपर अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास अधिकारी म्हणून निरीक्षक रुपेश जाधव यांनी काम पाहिले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की, जर कोणताही लोकसेवक किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल, तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा.  संपर्क क्रमांक ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ आहेत.   


Anti-Corruption, Bribery, Local Government, Pune, Daund, Law Enforcement

 #PuneACB #AntiCorruption #Daund #BriberyCase #MaharashtraPolice #CorruptionFree #RupeshJadhav


दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहायक एसीबीच्या जाळ्यात दौंड नगरपरिषदेतील  नगररचना सहायक एसीबीच्या जाळ्यात Reviewed by ANN news network on ७/२५/२०२५ ०४:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".