नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने पक्षाला तळमळीचा नेता मिळाला: गडकरींचे प्रतिपादन

 


'हाडाचा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाला, केवळ भाजपामध्येच हे शक्य' - नितीन गडकरी

मुंबई, दि. २ जुलै २०२५: भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने पक्षाचा तळागाळातील हाडाचा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाला आहे. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी असून, सामान्य कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, हे केवळ भाजपामध्येच शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी यांनी मंगळवारी मुंबईत केले. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा करण्याच्या कार्यक्रमाचा समारोप करताना ते बोलत होते.

गडकरी यांनी रवींद्र चव्हाण यांच्या पक्षकार्याच्या तळमळीची प्रशंसा करताना सांगितले की, रवींद्र चव्हाण यांचे आई-वडील कोणी आमदार नव्हते, त्यांच्या पाठीशी कुटुंबाचा उद्योग व्यवसाय नव्हता. ते पक्षाचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कोकणातील गावागावात जाऊन पक्षाचा विस्तार केला आणि पक्षाला यश मिळवून दिले. असे दैवदुर्लभ कार्यकर्ते ही भाजपची संपत्ती असून, कार्यकर्त्यांच्या त्याग व बलिदानामुळेच पक्ष मोठा झाला आहे. त्यांच्या रुपाने आपल्यातीलच एक कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाल्याचा कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे, असेही गडकरी म्हणाले.

ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष सत्तेच्या ६० वर्षांत जे काम करू शकला नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या अकरा वर्षांत देशात झाले आहे. पण अजूनही खूप काम करायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलर्सची करून जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील महायुती सरकार ताकदवान आहे. त्यासोबत रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात संघटनही मजबूत असेल. या दोन्हीच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित राज्यात 'शिवशाही' आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गडकरींनी पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचाही गौरव केला. पक्षाचा संघर्षशील कार्यकर्ता किती मोठा होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रात्रंदिवस प्रवास करून पक्षासाठी काम केले आणि त्यांच्या नेतृत्वात पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले, असे गडकरींनी नमूद केले.

 Politics, Maharashtra, BJP, Nitin Gadkari, Ravindra Chavan, Leadership, Grassroots, Economic Development, Shivshahi, Government

 #MaharashtraPolitics #BJP #NitinGadkari #RavindraChavan #Leadership #GrassrootsWorker #ModiGovernment #DevendraFadnavis #Shivshahi #Maharashtra #PoliticalNews

नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने पक्षाला तळमळीचा नेता मिळाला: गडकरींचे प्रतिपादन नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने पक्षाला तळमळीचा नेता मिळाला: गडकरींचे प्रतिपादन Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०९:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".