राज्यात पहिली ते चौथी हिंदी सक्तीला शरद पवार यांचा विरोध (VIDEO)

 


कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शाळेत हिंदी सक्तीची करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   

शरद पवार म्हणाले की, "पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शाळेत हिंदी सक्तीची करणं योग्य नाही." मात्र, त्यांनी पाचवी इयत्तेनंतर हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "पाचवीनंतर हिंदी येणं त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक आहे, देशात ५५ टक्के लोक हिंदी बोलतात, दुसरी भाषा नाही जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोलली जाते, त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करूनही चालणार नाही."   

यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबतही भाष्य केले. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात सरकारची आणि शेतकऱ्यांची भूमिका काय आहे, याची माहिती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 Sharad Pawar, NCP Sharadchandra Pawar, Hindi Language, Education Policy, Maharashtra, Kolhapur, Shaktipeeth Expressway, Language Policy

 #SharadPawar #HindiLanguage #EducationPolicy #MaharashtraPolitics #NCP #LanguageDebate #Kolhapur #ShaktipeethExpressway

राज्यात पहिली ते चौथी हिंदी सक्तीला शरद पवार यांचा विरोध (VIDEO) राज्यात पहिली ते चौथी हिंदी सक्तीला शरद पवार यांचा विरोध (VIDEO) Reviewed by ANN news network on ६/२७/२०२५ ०६:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".