प्लास्टिक बंदीला प्रोत्साहन, ५००० कापडी पिशव्यांचे मोफत वितरण
खारघर, दि. ५ जून: प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारा उपद्रव ही जागतिक समस्या बनली आहे. या समस्येला मुळापासून आळा घालण्यासाठी शिवसेना पनवेल पक्षाने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज खारघर सेक्टर ३४ व ३५ येथील दुकानदारांना ५००० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले.
पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. येत्या काळात दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्यांमधून सामान दिल्यास दंड वसूल करण्याचे आदेश सर्वत्र देण्यात आले आहेत.
पर्यावरण आणि प्लास्टिकमुळे होणारा नैसर्गिक असमतोल टाळण्यासाठी शिवसेना महानगर संघटक मंगेश रानवडे यांच्या पुढाकाराने व शिवसेना पनवेल पदाधिकारी इम्तियाज शेख, मुनाफ अमिराली, निवृत्ती सकपाळ, ज्योती नाडकर्णी आणि नंदीता रॉय यांच्या समवेत या कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
#EnvironmentDay #PlasticBan #ShivSena #Panvel #Kharghar #GoGreen #EcoFriendly #Maharashtra #EnvironmentalProtection #CommunityService

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: