पुणे गुन्हे शाखा युनिट-३ च्या जाळ्यात मोक्कातील फरार आरोपी; वारजे माळवाडी पोलिसांच्या केले हवाली

 


पुणे: वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 'मोक्का' कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने स्वारगेट एसटी स्टँड परिसरातून अटक केली आहे. रोहन राजेश धिवार (वय २२ वर्षे, रा. वडगाव धायरी, पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस अंमलदार अमित बोडरे आणि चेतन शिरोळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ४२४/२०२४   मोक्का गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी रोहन राजेश धिवार (वय २२ वर्षे, रा. वडगाव धायरी, पुणे) हा स्वारगेट एसटी स्टँडजवळ आला आहे.

ही माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी  अपर  आयुक्त (गुन्हे)   पंकज देशमुख,  उप आयुक्त (गुन्हे)  निखिल पिंगळे,  सहा.  आयुक्त (गुन्हे-१)  गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ  निरीक्षक  रंगराव पवार, सहाय्यक   निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, परि. उपनिरीक्षक स्वप्नील हंस, सुरेश पाटील, आणि  अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, किशोर दुशिंग, चेतन शिरोळे, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे व चालक सुजीत पवार यांनी केली.

  • --------------------------------------------------------------------------------------------------------#PunePolice, #CrimeNews, #MCOCA, #Arrest, #WarjeMalwadi
पुणे गुन्हे शाखा युनिट-३ च्या जाळ्यात मोक्कातील फरार आरोपी; वारजे माळवाडी पोलिसांच्या केले हवाली पुणे गुन्हे शाखा युनिट-३ च्या जाळ्यात मोक्कातील फरार आरोपी; वारजे माळवाडी पोलिसांच्या केले हवाली Reviewed by ANN news network on ६/०५/२०२५ ०१:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".