दमदार इंजिन आणि प्रभावी रेंज:
एक मजबूत २.५-लिटर टर्बोचार्ज्ड CNG इंजिनद्वारे संचालित बोलेरो MaXX पिक-अप HD १.९ CNG, ६१ kW ची शक्ती आणि श्रेणीत सर्वोत्तम २२० Nm टॉर्क @ १,२००–२,२०० rpm वितरीत करते, जे कठीण भार परिस्थितीतही अतुलनीय कार्यक्षमता सुनिश्चित करते. विशेषतः लांब पल्ल्याच्या कामकाजासाठी डिझाइन करण्यात आलेले हे वाहन एक सिंगल CNG पूर्ण भरल्यावर ४०० किमी* पर्यंतचा प्रभावी प्रवास करू शकते. यामध्ये १८०-लिटरची टाकी क्षमता आहे. हे वाहन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पॉवर स्टीअरिंगसह सुसज्ज असून शहरी आणि निमशहरी परिसरात सहजपणे चालवता येते.
प्रगत तंत्रज्ञान आणि चालकाचा आराम:
बोलेरो MaXX पिक-अप HD १.९ CNG हे महिंद्राचे पहिले CNG पिकअप असून, यामध्ये प्रगत iMAXX टेलिमॅटिक्स सोल्यूशनद्वारे समर्थित आधुनिक कनेक्टेड तंत्रज्ञान आहे. ही नाविन्यपूर्ण प्रणाली रिअल-टाईम वाहन माहिती पुरविते, ज्यामुळे जास्त कार्यक्षम कामकाज आणि अधिक स्मार्ट फ्लीट व्यवस्थापन शक्य होते. चालकाच्या आरामास प्राधान्य देत, या पिकअपमध्ये एअर कंडिशनिंग व हीटिंग सिस्टम असून त्यामुळे सर्व हवामान परिस्थितींमध्ये वाहन चालवणे सुलभ होते. तसेच उंचीनुसार अॅडजस्ट करता येणाऱ्या ड्रायव्हर सीटमुळे एर्गोनोमिक सपोर्ट मिळतो. शिवाय, D+२ आसनरचना यामुळे या वाहनाचा वापर अनेक प्रकारच्या उपयोजनांसाठी केला जाऊ शकतो.
मोठा कार्गो बेड आणि मजबूत डिझाइन:
३०५० mm लांबीचा प्रशस्त कार्गो बेड असलेले हे वाहन सहजतेने मोठे लोड हाताळू शकते. यामध्ये मजबूत १६-इंच टायर आणि पुढील व मागील ऍक्सलवर टिकाऊ लीफ स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आले आहेत. ते विविध प्रकारच्या प्रदेशात उत्कृष्ट पकड आणि स्थिरता पुरविते.
महिंद्राने बोलेरो MaXX पिक-अप HD १.९ CNG चे सादरीकरण करून मजबूती, टिकाऊपणा, विश्वासार्हता, कमी देखभाल खर्च आणि उच्च पुनर्विक्री मूल्या संदर्भातील आपले नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भारताच्या वाहतूक व लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या सतत बदलत्या गरजांना पूर्तता करण्यासाठी हे भविष्यकालीन उपयुक्त वाहन खास तयार करण्यात आले आहे.
Commercial Vehicle, Pickup Truck, CNG Vehicle, Mahindra, Automobile, Logistics, Small Business Vehicle
#Mahindra #BoleroMaXX #CNG #PickupTruck #CommercialVehicle #NewLaunch #MadeInIndia #Logistics #Automobile #MaXXPower

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: