मौजमजेसाठी मोटरसायकल चोरणारा जेरबंद

 


 पुणे: मौजमजेसाठी मोटरसायकलची चोरी करणाऱ्या एका २१ वर्षीय चोरट्याला समर्थ पोलीस स्टेशनने जेरबंद केले आहे. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजि नंबर १३५/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३() नुसार ही कारवाई करण्यात आली.  

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची निळ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल ११ जून २०२५ रोजी त्यांच्या घराजवळ, मोती मशीदसमोर, मंगळवार पेठ, पुणे येथे लॉक करून पार्क केली असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने ती लबाडीच्या इराद्याने चोरी केली होती.   

 वरीष्ठांच्या आदेशाने , या गुन्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथक रवाना करण्यात आले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल गावडे , इम्रान शेख शरद घोरपडे यांनी घटनास्थळ तसेच आजूबाजूचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासून आणि गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून अज्ञात चोरट्याचा माग काढत वडगावशेरी, पुणे येथे आरोपीपर्यंत पोहोचले.   

आरोपी साहिल रहीम शेख (वय २१ वर्षे, रा. सिद्धार्थ नगर, लोणावळा नगरपालिका वसाहत, शिवाजी चौक, लोणावळा, पुणे, सध्या पुणे फिरस्ता) याला शिताफीने पकडण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने १२ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास मोती मशीदसमोरून निळ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेली मोटरसायकल तसेच एक चोरीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.   

ही  कामगिरी अपर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर,  राजेश बनसोडे,  उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर परिक्षेत्र ०१, पुणे शहर, (अतिरिक्त कार्यभार)  निखिल पिंगळे,  सहायक  आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर,  अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ  निरीक्षक  उमेश गित्ते,  निरीक्षक (गुन्हे),  चेतन मोरे , तपास पथकातील  उप-निरीक्षक जालिंदर फडतरे ,  अंमलदार पागार , रोहिदास वाघेरे , इम्रान शेख , औचरे , शिवा कांबळे , अमोल गावडे , शरद घोरपडे आणि भाग्येश यादव यांनी केली.  

Crime, Theft, Police Action 

#PunePolice #MotorcycleTheft #CrimeNews #SamarthPolice #PuneCrime  

 


मौजमजेसाठी मोटरसायकल चोरणारा जेरबंद मौजमजेसाठी मोटरसायकल चोरणारा जेरबंद Reviewed by ANN news network on ६/१८/२०२५ ०५:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".