मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित; पावसामुळे खचलेल्या भरावाची तात्काळ दुरुस्ती सुरू
नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण सुरू
मुख्य अभियंता राजभोज यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या भोवतालच्या परिसराची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. पावसामुळे खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, हे काम अत्यंत तत्परतेने विभाग करत असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
पाहणी दौऱ्यात अधिकारी वर्ग उपस्थित
या पाहणी दौऱ्यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, उप अभियंता अजित पाटील, मे. राम सुतार आर्ट क्रिएशनचे प्रतिनिधी त्रिविक्रम प्रभुगावकर, स्वातंत्र्य गुणवत्ता सल्लागार सी.एन. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता सुरज गिरी, अभियंता श्री. बावणे आदी अधिकारी उपस्थित होते.
- Public Works Department, Rajkot Fort, Malvan, Chhatrapati Shivaji Maharaj Statue, Monsoon Damage, Inspection, Restoration, Sindhudurg District, Infrastructure Safety
- #Malvan #RajkotFort #ShivajiMaharaj #Sindhudurg #PublicWorks #Monsoon #Restoration #MaharashtraNews #HistoricalSite

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: