पुणे: सहकारनगर येथील काशिनाथ पाटील नगर, बालाजीनगर, धनकवडी परिसरात चारचाकी गाडी पार्क करण्याच्या वादातून एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून चोरल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०३/०६/२०२५ रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास शितल अपार्टमेंटसमोर सार्वजनिक रोडवर ही घटना घडली. फिर्यादी (वय ३८ वर्षे, रा. थेरगाव, पुणे) हे आपली चारचाकी गाडी पार्क करत असताना, झालेल्या वादातून आरोपी बबलू विवेक कोठारी (वय ३० वर्षे, रा. काशिनाथ पाटील नगर, बालाजीनगर, धनकवडी, पुणे), लोकेश विवेक कोठारी (वय २१ वर्षे, रा. सदर) आणि शाम चांदेकर (वय २१ वर्षे, रा. सदर) यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील २५,०००/- रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील पुढील तपास करत आहेत.
- ----------------------------------------------------------------------------------------------------------------- #Robbery, #ChainSnatching, #SahakarnagarCrime, #PunePolice, #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: