पुणे: कोंढवा बुद्रुक येथील कमल रेसिडेन्सीमध्ये एका घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १०,७५,०००/- रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरट्यांनी सोसायटीच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०३/०६/२०२५ रोजी दुपारी १:०० वाजल्यापासून ते दि. ०४/०६/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या दरम्यान ए४/३, कमल रेसिडन्सी, सर्वे नं. ६०, सुखसागर नगर भाग ०२, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या (वय ५९ वर्षे) राहत्या घराचे लोखंडी गेटचे व लाकडी दरवाजाचे कडीकोयंडे व कुलूप कोणीतरी अज्ञात इसमाने कापून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील रोख ५,०००/- रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण १०,७५,०००/- रुपयांचा ऐवज चोरला. तसेच, सोसायटीच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात पुढील तपास करत आहेत.
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------ #Burglary, #KondhwaCrime, #Theft, #PunePolice, #CCTVSurveillance

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: