नांदेडसिटीत उसन्या पैशांच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत

 


पुणे: नांदेडसिटी परिसरातील जाधवनगर, रायकरमाळा येथे उसण्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी नितीन चंद्रकांत पंडीत (वय ५१ वर्षे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४/०६/२०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास धायरी येथील सूर्य उज्वल हाईट्स, जाधवनगर, रायकरमाळा येथील फ्लॅट नं. ३०२ मध्ये ही घटना घडली. निलेश तनपुरे, पोलीस अंमलदार, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी नितीन चंद्रकांत पंडीत (वय ५१ वर्षे, रा. निसर्ग हाईट्स जवळ, धायरी, पुणे) आणि श्यामली कमलेश सरकार (वय ४० वर्षे, रा. सूर्य उज्वल हाईट्स, जाधवनगर, रायकरमाळा, धायरी, पुणे) यांच्यात उसने दिलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून वाद सुरू होता. या वादातून रागाच्या भरात नितीन पंडीत याने श्यामली सरकार हिचा ओढणीने गळा आवळला आणि तिला जीवे ठार मारले.

या घटनेची माहिती मिळताच, नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १११/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गुरुदत्त मोरे  करत आहेत.

  • -------------------------------------------------------------------------------------------------------------- #PuneCrime, #Murder, #NandedCity, #Arrest
नांदेडसिटीत उसन्या पैशांच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत नांदेडसिटीत उसन्या पैशांच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत Reviewed by ANN news network on ६/०६/२०२५ ०४:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".