पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी ४ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे.
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आणि त्यांच्यावरील गुन्हे:
-
नारायण रामदास स्वामी: वय ३८ वर्षे, रा. कोंढवा.
यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि विनापरवाना दारू विक्री करणे यांसारखे ७ गुन्हे दाखल आहेत. -
नेहाल विराज कुंभार: वय २८ वर्षे, रा. कोंढवा.
यांच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे यासारखे ४ गुन्हे दाखल आहेत. -
शुभम रमेश कवडे: वय ३० वर्षे, रा. फुरसुंगी, पुणे.
यांच्यावर गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे ठार मारणे, धमकावणे आणि बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यांसारखे ४ गुन्हे दाखल आहेत. -
गणेश मेघनाथ भाट/तमायची: वय ३२ वर्षे, रा. घोरपडी, पुणे.
यांच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करणे आणि शिवीगाळ करून धमकावणे यांसारखे ४ गुन्हे दाखल आहेत.
हे सर्व गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
जानेवारी २०२५ पासून परिमंडळ ५ कार्यालयाने १३ सराईत गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए.
तडीपार केलेले गुन्हेगार हद्दपारीच्या काळात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात आढळल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष ११२ किंवा जवळील पोलीस ठाणे अथवा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ कार्यालयाशी ०२०-२६८६१२१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#PunePolice #CrimeNews #Tadipar #Maharashtra #Pune #LawAndOrder #CriminalActivity
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२५ ०५:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: