रविवार, १ जून, २०२५

तक्रार निवारण दिनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद, १२०० हून अधिक तक्रारदार उपस्थित

 


मुंबई: पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशानुसार आणि पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबई यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या तक्रार निवारण दिनाचे ३१ मे, २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता. पोलीस ठाण्यात दाखल दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यांतील फिर्यादी तसेच तक्रार अर्जांमधील अर्जदार असे एकूण १२१७ तक्रारदार हजर होते.

यामध्ये ४४८ महिला तक्रारदार आणि १७४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारींचे निरसन केले.

यावेळी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते, तसेच प्रादेशिक विभागांचे अपर पोलीस आयुक्त आणि परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा