अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर इराण-इस्रायल संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींची तीव्र चिंता; मुत्सद्देगिरीचे आवाहन (VIDEO)
नवी दिल्ली, २२ जून २०२५: अमेरिकेने इराणमधील अण्वस्त्र ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराण-इस्रायल संघर्षाला गंभीर वळण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आज (शनिवार, २२ जून) इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी या सद्यस्थितीबाबत विस्तारानं चर्चा केली.
पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यम संदेशात म्हटले आहे की, परिस्थितीमधून मार्ग काढण्याकरता तात्काळ तणाव कमी करण्यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचं आवाहन त्यांनी केले आहे. प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य लवकरात लवकर निर्माण केलं जावं, यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला आहे.
अमेरिकेच्या या कारवाईमुळे पश्चिम आशियातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, या जागतिक घडामोडींवर भारताकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या आवाहनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
Prime Minister Narendra Modi, Iran, Israel, Conflict, United States, Attack, Nuclear Sites, Iran President Masoud Pezeshkian, Diplomacy, De-escalation, Peace, Security, Stability, Middle East.
#PMModi #IranIsraelConflict #MiddleEast #Diplomacy #GlobalPeace #NuclearThreat #InternationalRelations #India

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: