पुणे: मुलीच्या लग्नासाठी आलेल्या मैत्रिणी आणि बहिणीचे कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शुक्रवार पेठेत राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांची मैत्रीण आणि बहीण घरी आल्या होत्या. त्यांचे सोन्याचे दागिने फिर्यादी यांनी राधाकृष्ण हॉटेलसमोरील शंकर कृपा अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते. १८ मे रोजी दुपारी साडेबारा ते २० मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चावीने कपाटाचे लॉकर उघडून त्यातील एकूण १ लाख ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने खडक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुर्वे करत आहेत. लग्नसराईच्या काळात मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #Theft #Burglary #KhadakPolice #ShukrawarPeth #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा