पुणे: पुणे शहर
आणि परिसरात तब्बल
१५० पेक्षा जास्त
घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या एका
सराईत गुन्हेगाराला कोंढवा
पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी
(वय ४७, रा.
७२ नंबर वस्ती,
मांजरीगाव, हडपसर) याला ताब्यात घेऊन
त्याच्याकडून सुमारे ३ लाख
४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल
असलेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासातून ही
मोठी कारवाई उघडकीस
आली आहे.
कोंढवा पोलीस
स्टेशन येथे ३
जून ते ४
जून २०२५ दरम्यान घडलेल्या एका
घरफोडीच्या गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने एका
घरातून २१ तोळे
सोने, रोकड आणि
सोसायटीच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी केला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात
घेऊन, कोंढवा पोलिसांनी तात्काळ दोन
तपास पथके तयार
केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे
तपास सुरू केला.
सलग पाच
दिवस १०० पेक्षा
जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
करून आरोपीचा माग
काढण्यात आला.
१० जून
२०२५ रोजी तपास
पथकातील कर्मचाऱ्यांना
गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती
मिळाली की, ही
चोरी रेकॉर्डवरील आरोपी
अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी याने केली
असून, तो मांजरीगावातील ७२
नंबर वस्ती येथील
त्याच्या राहत्या घराच्या परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा
रचून अर्जुनसिंगला शिताफीने ताब्यात घेतले
आणि दाखल गुन्ह्यात त्याला
अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी
अर्जुनसिंग दुधानी हा घरफोडी
करणारा अट्टल गुन्हेगार असून,
त्याच्यावर पुणे शहर व
परिसरात १५० पेक्षा जास्त
घरफोडी आणि चोरीचे
गुन्हे दाखल आहेत.
त्याच्याकडून ४०
ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २०
ग्रॅम वजनाची सोन्याची चैन
आणि गुन्ह्यात वापरलेली ४०,००० रुपये किमतीची होंडा
स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३
लाख ४० हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आहे.
उप-आयुक्त, परिमंडळ-५
पुणे शहर, राजकुमार शिंदे,
सहाय्यक आयुक्त, वानवडी विभाग,
धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही
कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ निरीक्षक, कोंढवा
पोलीस स्टेशन, विनय
पाटणकर, निरीक्षक गुन्हे,
नवनाथ जगताप, सहाय्यक निरीक्षक राकेश
जाधव, उप-निरीक्षक बालाजी
डिगोळे, आणि अंमलदार सतीश
चव्हाण, निलेश देसाई,
विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके,
लक्ष्मण होळकर, सुजित मदन,
सुरज शुक्ला, संतोष
बनसुडे, विकास मरगळे,
राहूल थोरात, अभिजीत
जाधव, सैफ पठाण
यांच्या पथकाने ही यशस्वी
कामगिरी केली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------- Pune Police, Kondhwa Police Station, Burglary, Criminal Arrest, Gold Theft, Crime News, Pune City, Maharashtra Police
#PunePolice #KondhwaPolice #BurglaryArrest #CrimeNews #PuneCity #Maharashtra #GoldTheft #PoliceAction

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: