पुणे: भरधाव वेगात असलेल्या पीएमपीएमएल बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकातील पोलीस अंमलदार सुनील भाऊलाल मोरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून रोजी रात्री ८:२० वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनच्या इन गेटजवळ, सम्राट हॉटेलसमोर हा अपघात झाला. आरोपी पीएमपीएमएल बस चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचारीपणे आणि भरधाव वेगात बस चालवली.
त्यावेळी इतवारी सुमेरसिंह तेकाम (वय ४७, रा. बालाघाट, मध्यप्रदेश) हे रस्ता ओलांडत होते. भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत तेकाम गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात पीएमपीएमएल बस चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) सह मोटार वाहन कायद्याचे कलम ११९, १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोसे करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #RoadAccident #FatalAccident #PMPML #BundGarden #PuneNews #RoadSafety
पुणे: पीएमपीएमएल बसच्या धडकेत मध्यप्रदेशातील व्यक्तीचा मृत्यू
Reviewed by ANN news network
on
६/०३/२०२५ ०४:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: