तीस लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त, ४ आरोपी अटकेत

 


ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

डोंबिवली: ठाणे गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने गोवा राज्यातून छुप्या मार्गाने आणलेला तब्बल ३० लाख रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांचे बनावट लेबल लावून दारू विक्री करण्याचे रॅकेट उघड झाले आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्रीकांत भागिरथ तोकडे (वय २७, ड्रायव्हर, रा. टिटवाळा पूर्व), वकील निवास मंडल (वय २३, क्लिनर, रा. कल्याण पूर्व), रवी संतोष तिवारी (वय ३०, रा. डोंबिवली पूर्व) आणि संजीत हजारी यादव (वय १९, रा. डोंबिवली पूर्व) यांचा समावेश आहे.

गेल्या ४ जून रोजी ठाणे गुन्हे शाखा घटक-१ ला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, काही व्यक्ती गोव्यातून कमी दर्जाच्या आणि कमी किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या बेकायदेशीरपणे डोंबिवली (पूर्व) येथील नेरूरकर रोड, सुदामवाडी परिसरात आणत आहेत. या बाटल्यांवरील लेबल काढून, त्यावर मूळ कंपनी/ब्रँडसारखे हुबेहूब बनावट लेबल लावून त्या महाराष्ट्रात विक्री करत आहेत. या माहितीनुसार, ४ जून रोजी रात्री ८.२५ वाजता पोलिसांनी डोंबिवली (पूर्व), सुदामवाडी येथील नेरूरकर रोडलगत सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-०५-एफजे-७८८४ हे वाहन ताब्यात घेतले. तपासणी केली असता, त्यात विदेशी मद्याचा साठा मिळून आला. पोलिसांनी वाहनचालक श्रीकांत तोकडे याच्याकडे कागदपत्रांची विचारपूस केली असता, तो असमर्थ ठरला. त्याने जवळच असलेल्या सुदामवाडी, पांडुरंग निवास चाळीतील एका पडक्या घरातून हा साठा आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणावरून रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स, रॉयल स्टेज अशा विविध ब्रँडच्या व्हिस्की आणि बिअरच्या एकूण १८,२९० बाटल्या (४४७ पुठ्ठ्यांचे बॉक्स) जप्त केल्या. तसेच, बनावट लेबल चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारी हीट गन, हॉट एअर गन्स, मिनी प्रिंटर मशीन, कार्ट्रिज आणि बनावट लेबल्स असे साहित्यही जप्त केले. या सर्व मुद्देमालाची किंमत अंदाजे ३० लाख रुपये आहे.

वरील आरोपींविरुद्ध डोंबिवली स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४४२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५) सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम ६५ (ए), ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे.

ही कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) विनायक देशमुख, उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सचिन गायकवाड, उपनिरीक्षक दीपक घुगे, उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक दयानंद नाईक, अंमलदार सुनील माने, दीपक जाधव, हवालदार संदीप महाडिक, बाळू मुकणे आणि शिपाई सागर सुरळकर यांनी  केली.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------Crime News, Thane Police, Human Trafficking, Armed Robbery, Liquor Smuggling, Maharashtra, Print Media, Breaking News

 #ThanePolice #CrimeNews #HumanTrafficking #ArmedRobbery #LiquorSmuggling #BreakingNews #Maharashtra #PrintMedia #CrimeBusters #LawEnforcement

तीस लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त, ४ आरोपी अटकेत तीस लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त, ४ आरोपी अटकेत Reviewed by ANN news network on ६/०७/२०२५ ०३:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".