पिंपरी-चिंचवड - मावळ मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिक्षणक्षेत्रातील दिग्गज नेते कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याने एक ज्येष्ठ राजकारणी आणि शिक्षणसेवक गमावला आहे.
त्यांच्या पश्चात कन्या राजश्री म्हस्के, जावई राजेश म्हस्के आणि नातवंडे हा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ११ वाजता तळेगाव दाभाडे येथील लेक पॅराडाईज येथील निवासस्थानातून निघणार आहे. तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कृष्णराव भेगडे हे मावळ तालुक्यातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. राजकीय जीवनात आमदार म्हणून त्यांनी ग्रामीण विकासाला चालना दिली. विशेषतः शिक्षण प्रसारात त्यांचे अमूल्य योगदान असल्याने त्यांना 'शिक्षणमहर्षी' या उपाधीने गौरवण्यात आले होते.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण मावळ तालुक्यात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय पक्षांचे नेते, शिक्षणक्षेत्रातील व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
- Political Obituary
- Maharashtra Politics
- Education Leader
- Maval Constituency
- Pune District News
- Senior Politicians
- Educational Reformer
#KrishnaraoBhegade #MavalMLA #PuneNews #MaharashtraPolitics #EducationLeader #ShikshanMaharshi #PoliticalObituary #TalegaonDabhade #MavalConstituency #PuneDistrict

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: